Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंद मागे, पण तोंडाला काळ्या फित्या, हातात काळे झेंडे घेऊन निषेध करणार - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेना भावनाबाहेर उद्या सकाळी ११ वाजता आंदोलनाला बसणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaamtv
Published On

Uddhav Thackeray Maharashtra Bandh : मुंबई हाय कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. कोर्टाचा आदर करुन आम्ही महाराष्ट्र बंद मागे घेत आहोत. पण आम्ही उद्या तोंड बंद करुन आणि काळ्या फित्या बांधून निषेध नोंदवू अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली. शिवसेना भावनाबाहेर उद्या सकाळी ११ वाजता आंदोलनाला बसणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही का ? असा सवालही यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला.

दरम्यान, आम्ही महाराष्ट्र बंद करणार नाही. पण जनतेनं बंद केल्यास संबंध नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय शरद पवार यांनी ट्वीट करत महाराष्ट्र बंद मागे घ्यावा अशी विनंती केली. आता उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेतल्याचं जाहीर केले. महाविकास आघाडीने शनिवारचा महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. पण महाविकास आघाडीचे नेते निषेध नोंदवणार आहेत.

Uddhav Thackeray
Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवारांचे आवाहन, ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

महाविकास आघाडीचे सर्व नेते बाहेरगावी आहेत. त्यामुळे आमची फोनवर चर्चा झाली. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळे झेंडे घेऊन निषेध नोंदवतील. मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. पण शनिवार-रविवार आल्यामुळे इतक्यात जाता येत नाही.

Uddhav Thackeray
Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा, महायुतीतील वादाच्या ठिणग्या उडणार?

शनिवारचा बंद विक्रृतीविरोधात होता. उच्च न्यायालयाने या बंदला मनाई केली. न्यायालय इतक्या तत्परतेने निर्णय देऊ शकतो, याचं कौतुक वाटते. न्यायालयाने हीच तत्परता बदलापूर प्रकरणात दाखवावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र बंद आम्ही मागे घेतोय. पण राज्यभर शहरात, गावात अन् चौका चौकात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तोंडाला काळ्या फित्या आणि हातात काळे झेंडे घेऊन निषेध नोंदवतील.

बंदला तुम्ही बंद म्हटलेत.आम्ही तोंड बंद ठेवतो. लोकशाही माणणाऱ्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक आहे की नाही? मोर्चे, आंदोलन, संप यालासुद्धा बंदी आहे का? लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का? यावर घटना तज्ज्ञांनी आपली मते मांडावीत.

आवाहन आणि आव्हानात फरक आहे. मी जनतेला आवाहन केले होते. ते त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे म्हणून केले होते.

भावना व्यक्त करण्याचा अधिकार जनतेला आहे की नाही?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com