Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवारांचे आवाहन, ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

Maharashtra News : शरद पवार यांनी महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलेय. आता यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेय.
sharad pawar on maharashtra bandh 24 august
Saam TVsharad pawar on maharashtra bandh 24 august
Published On

Maharashtra Bandh 24 August : शनिवारी (२४ ऑगस्ट) रोजीचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवार यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाले होते . त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत घेत महाराष्ट्र बंदची माहिती देण्यात आली होती.

शनिवारच्या मविआच्या महाराष्ट्र बंदला सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आवाहन दिले होते. कोर्टाकडून हा बंद योग्य नसल्याचं सांगण्यात आले. त्याशिवाय बंद करणाऱ्याविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी हा बंद मागे घेण्याचे आवाहन केलेय. शरद पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

शरद पवार यांनी महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलेय. आता यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेय.

sharad pawar on maharashtra bandh 24 august
Uddhav thackeray : उद्याचा महाराष्ट्र बंद कसा असेल? उद्धव ठाकरे यांनी सविस्तर सांगितलं, VIDEO

उद्याचा बंद मागे घ्या -

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.

हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.

sharad pawar on maharashtra bandh 24 august
Maharashtra Bandh: २ वाजेपर्यंत महाराष्ट्र बंद, बस-लोकल बंद ठेवा; उद्धव ठाकरे काय काय म्हणाले?

कोर्टाने काय म्हटले ?

उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने पुकारेला बंद बेकायदेशी आहे, अशा संवेदनशील घटनाबाबत कोणीही बंद पुकारू शकत नाही, तरीही कोणी बंद पुकारून आंदोलन केलं तर सरकाला कायेदशीर कारवाई करण्याचे अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हलटं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com