Maharastra Politics : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का; पुण्यातील बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

Maharastra Political News : एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी केली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
shivsena
shivsena newsSaam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना धक्के देणे सुरुच आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या महिन्यात माजी आमदार महादेव बाबर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

shivsena
Pune Crime: ब्रेकअपचा राग डोक्यात, सनकी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल, प्रेयसीच्या घरी गेला अन्...

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माजी आमदार महादेव बाबर हे त्यांच्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

shivsena
Panvel Crime : पनवेल हादरलं! ४ वर्षांच्या चिमुरडीवर ज्येष्ठ नागरिकाचा अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट

तिकीट न मिळाल्याने बाबर होतो नाराज

विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर नाराज होते. बाबर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तिकिटाची मागणी केली होती. बाबर हे हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार होते. मात्र त्यांची मागणी महाविकास आघाडीकडून डावलण्यात आली.

फेब्रुवारीत शिंदेंच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील नऊ ते दहा आजी-माजी नगरसेवक करणार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या नगरसेवकांच्या यादीत काही मोठे नाव असण्याची शक्यता आहे.

shivsena
Crime: हिंजवडीत खळबळ! २० वर्षांच्या मुलाला लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टला बाम चोळलं, व्हिडीओ केला व्हायरल

काँग्रेसचेही अनेक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस नगरसेवकासह माजी आमदार रवींद्र धंगेकर देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धंगेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com