Maharashtra Politics : उद्धव ठाकरे-राज ठाकरेंमध्ये आठवडाभरात अनेकदा भेटी, भाजपच्या अडचणी वाढल्या?

Uddhav Thackeray, Raj Thackeray : उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात अलीकडे अनेकदा भेटी झाल्यामुळे मनसे-शिवसेना युतीची चर्चा रंगली आहे. आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं परिवर्तन घडू शकतं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Raj and Uddhav Thackeray’s political alliance sparks a divide within MNSsaam tv
Published On

Uddhav Thackeray Raj Thackeray Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दशकांपासून राजकीय विरोधक म्हणून एकमेकांवर टीका करणारे भाऊ एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे. वरूण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यामध्येही शुक्रवारी भेट झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. रिपोर्ट्सनुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांत अनेकदा भेटी झाल्या आहे. त्यातच हिंदी सक्ती आणि मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांनी जनतेला हाक दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकऱण उदयास येत असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना, हे दोन्ही पक्ष पहिल्यापासूनच मराठी माणसाचा आवाज म्हणून राजकारणात सक्रीय आहेत. त्यात जर या दोन्ही पक्षाची युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. राज-उद्धव एकत्र आले तर आगामी मनपा निवडणुकीत भाजप, महायुती अन् मविआला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
संतापजनक! IIT कॅम्पसमध्ये २० वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, फूड कोर्ट चालवणाऱ्याला बेड्या

मविआसमोर सर्वात मोठं आव्हान?

फक्त भावनिकच नव्हे तर राजकीय समीकरणासाठीही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळू शकते. जर दोन्ही बंधू एकत्र आले तर भाजप अन् मविआ यांच्यासमोर नवीन आव्हान उभं असेल. एकनाथ शिंदे यांनाही आपली रणनिती बदलावी लागेल.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
महिला कीर्तनकाराची आश्रमातच हत्या, दगडाने ठेचून घेतला जीव, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

ठाकरे बंधूंकडून अद्याप मौन -

मनसे-शिवसेनेच्या युतीसंदर्भात राज ठाकरे अथवा उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप अधिकृत कोणतेही वक्तव्य समोर आले नाही. दोन्ही नेत्यांचे मौन अन् पक्षातील इतर नेत्यांच्या वक्तव्यावरून युतीची शक्यता समोर येतेय. त्यातच शुक्रवारी वरूण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये भेट झाली. ही युतीच्या चर्चेची सुरूवात असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. जर युती यशस्वी झाली तर हे फक्त राजकीय नसेल तर ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न म्हटलं जाईल. दरम्यान, ५ जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चाची घोषणा केली आहे. मुंबई मनपाच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार हादरे, साखरझोपेत असताना जमीन हादरली, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com