Nilesh Rane : निलेश राणेंच्या विरोधात ठाकरे गटाने वाजविला "बँड बाजा", आंदोलनाची पुण्यात खुमासदार चर्चा

UBT Shivsena : पुण्यातील बहुतांश मालमत्ताधारकांनी अद्याप मिळतकर भरलेला नसल्याने पुणे महापालिकेचे वसूली पथक आक्रमक झालेय, ते थकबाकीदारांच्या मिळकती सील करीत आहे.
ubt shivsena played musical band in front of nilesh rane property at deccan pune
ubt shivsena played musical band in front of nilesh rane property at deccan punesaam tv
Published On

- अक्षय बडवे

Pune News :

पुण्यातील डेक्कन (deccan pune) परिसरातील आर डेक्कन येथील इमारतीसमाेर आज (बुधवार) सांयकाळच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते निलेश राणेंच्या (bjp leader nilesh rane) विरोधात "बँड बाजा" आंदोलन छेडले आहे. या आंदाेलनाची खूमासदार चर्चा परिसरात सुरु आहे. (Maharashtra News)

पुणे महापालिका प्रशासन थकीत मिळकतकर वसूल करण्यासाठी बड्यांसह छाेट्या थकबाकीदारांवर कारवाई करीत आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी सव्वा महिना शिल्लक असताना प्रशासनापुढं सुमारे 400 कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान आहे.

ubt shivsena played musical band in front of nilesh rane property at deccan pune
Ranjitsinh Naik Nimbalkar : शंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल; मोहिते-पाटील गटाचा रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटास दणका

आज महापालिकेने आर डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मिळकत सील केली. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनूसार निलेश राणेंची तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान निलेश राणेंकडून थकीत रक्कम लवकर वसूल व्हावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मैदानात उतरलेत. त्यांनी आज आर डेक्कन परिसरातील राणेंच्या इमारतीसमाेर जात बँड वाजविला.

Edited By : Siddharth Latkar

ubt shivsena played musical band in front of nilesh rane property at deccan pune
Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank : द्वारकादास मंत्री बँकेचे निर्बंध आरबीआयने उठवले : डाॅ. आदित्य सारडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com