ठाण्यात भीषण अपघात; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू | Thane

Tragic Accident in Thane: ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे भरधाव डंपरने धडक दिल्याने पोलीस हवालदार सुरेश भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला. चालक फरार असून पोलीस तपास सुरू आहे.
Tragic Accident in Thane
Tragic Accident in ThaneSaam Tv News
Published On

ठाण्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर येत आहे. डंपरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना ठाण्यातील कॅडबरी जंक्शन परिसरात आज सकाळी घडली. मृत पोलीस हवालदार आपल्या दुचाकीवरून प्रवास करीत होते. दरम्यान, त्याचवेळी एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर फरपटत कोसळले. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सुरेश भालेराव असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते दुचाकीवरून ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथून जात होते. यादरम्यान, त्यांच्या दुचाकीमागून भरधाव डंपर आले. वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यांना दुरवर फरपटत नेलं. अपघात घडल्यानंतर स्थानिक रहिवासी आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस हवालदाराला खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले.

Tragic Accident in Thane
Building Collapse: ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, १२ जण ढिगाऱ्याखाली अडकले; भयंकर प्रसंग कॅमेऱ्यात कैद

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला. सध्या पोलिसांकडून डंपर चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर भालेराव यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे. पोलीस हवालदाराच्या दुर्देवी मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Tragic Accident in Thane
Politics: दोन्ही 'संजय'मुळे एकनाथ शिंदे सापडले चक्रव्यूहात, कडक शब्दात टोचले कान; नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com