Pimpri Accident: कोथिंबीर आणायला गेला अन् परत आलाच नाही, भरधाव जेसीबीनं चिमुकल्याला चिरडलं

Pimpri Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव जेसीबीने चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. या अपघातामध्ये ६ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेसीबी चालकाला पोलिसांनी अटक केली.
Pimpari Accident
Pimpri Chinchwad AccidentSaamTV
Published On

पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. कोंथिंबीर आणण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. भरधाव जेसीबीने ६ वर्षांच्या चिमुकल्याला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि रक्तस्राव झाल्यामुळे चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी जेसीबी चालकाला पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी -चिंचवड शहरातील मोशी गोडाऊन चौक परिसरात ही घटना घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या एका जेसीबीने ६ वर्षीय चिमुकल्याला धडक दिली. या अपघातामध्ये ऋषिकेश जयदेव खराडेचा मृत्यू झाला. ऋषिकेशने जागीच प्राण सोडले. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Pimpari Accident
Singer Pawandeep Accident: इंडियन आयडॉल विजेता पवनदीप राजनच्या कारला भीषण अपघात; गंभीर जखमी

ऋषिकेशला घरच्यांनी कोथिंबीर आणण्यासाठी सांगितले होते. कोथिंबीर आणायला गेले असता त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. मृत ऋषिकेशच्या मावशीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक राहुल रामचंद्र जाधवच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकाला अटक केली.

Pimpari Accident
Nandurbar Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात; घाटात वळण घेताना धुळे-सूरत बस उलटली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com