Shreya Maskar
कोथिंबीर चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या , शेंगदाणे, लिंबाचा रस, मीठ इत्यादी साहित्य लागते.
कोथिंबीर चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्या.
त्यानंतर लसूण, आलं, हिरव्या मिरची यांची मिक्सरला पेस्ट करून घ्या.
आता कोथिंबीर स्वच्छ धुवून थोडे पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्या.
भाजलेल्या शेंगदाण्यांची साल काढून बारीक वाटून घ्या.
आता एका बाऊलमध्ये बारीक शेंगदाण्याची पेस्ट, कोथिंबीर पेस्ट, हिरव्या मिरची छान मिक्स करून घ्या.
शेवटी लिंबाचा रस आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा.
गरमागरम भाकरीसोबत कोथिंबीर चटणीचा आस्वाद घ्या.