Shreya Maskar
आंबील बनवण्यासाठी तेल, मोहरी, ज्वारी, हिरवी मिरची, पांढरे तीळ, कढीपत्ता, मीठ, खोबऱ्याचे तुकडे आणि दही इत्यादी साहित्य लागते.
ज्वारीच्या पीठाचे आंबील बनवण्यासाठी सर्वप्रथम ज्वारी पाण्यात भिजवत ठेवा.
त्यानंतर ज्वारी मिक्सरला वाटून पेस्ट बनवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून भाजून घ्या.
या मिश्रणात पांढरे तीळ आणि खोबऱ्याचे तुकडे टाका.
फोडणीत दही टाकून सतत ढवळत रहा.
आता या मिश्रणात ज्वारीचा पीठाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
कोकण स्पेशल पारंपरिक पद्धतीने पौष्टिक 'आंबील' तयार झाले.