Nandurbar Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात; घाटात वळण घेताना धुळे-सूरत बस उलटली

Bus Accident In Kondaibari Ghat: कोंडाईबारी घाटाच्या वळणावर सहा वाजेच्या सुमारास बस उलटी झाल्याने अपघात झालाय. धुळे-सुरत बसमधील 20-25 प्रवासी जखमी झालेत.
Bus Accident
Nandurbar Bus Accident
Published On

नंदुरबारमध्ये धुळे- सूरत बसचा भीषण अपघात झालाय. कोंडाईबारी घाटाच्या वळणावर बस उलटली असून यात २० ते २५ प्रवाशी जखमी झाले आहेत. बसचा अपघात पहाटे ६ वाजेच्या दरम्यान घडलाय. वळणावरून उलटून बस घाटाच्या खालच्या रस्त्यावर कोसळली.

नवापूरहून दोन रुग्णवाहिका आणि विसरवाडीहून एक रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झालीय. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघातग्रस्तांना नवापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी करण्यात दाखल करण्यात आली.

मालवाहू ट्रकनं घेतला पेट

नाशिकच्या येवला तालुक्यातील धानोरे शिवारात अपघातग्रस्त मालवाहू ट्रकने पेट घेतला. येवला-मनमाड राज्य मार्गावर ट्रकचा अपघात झाला होता. अपघातानंतर ट्रकला अचानक आग लागली. आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय. ट्रकला लागलेल्या आगीमुळे नगर-मनमाड मार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद झाला होता.

दरम्यान ट्रकला आग लागल्याची माहिती येवला येथील अग्निशामक दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.

Bus Accident
Accident : नागपुरात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, टेम्पोचा चक्काचूर

प्रवाशांनी भरलेली बस उलटली

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव ते पिंपळगाव राजमार्गावर प्रवाशांनी भरलेली एसटी बस रात्रीच्या वेळी उलटली. या अपघातात १२ प्रवासी जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. घाटपुरी ते पिंपळगाव राजा रस्त्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी रस्त्याच्या बाजूला वाळू आणि खडीचा भराव टाकण्यात आलाय. या भरावावरून बस उलटली.

Bus Accident
Amaravati News: २२ वर्षीय कुस्तीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अमरावतीत हळहळ

देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

अक्कलकोट- तुळजापूर महामार्गावर दुपारच्या सुमारास कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गावाजवळ हा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com