Amaravati News: २२ वर्षीय कुस्तीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अमरावतीत हळहळ

Young Wrestler Dies of Heart Attack in Amaravati: अमरावतीच्या आजाद चौक येथे राहणाऱ्या २२ वर्षीय राज्यस्तरीय कुस्तीपटू प्राप्ती सुरेश विघ्ने हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गावातून शोक व्यक्त.
Amravati
AmravatiSaam
Published On

अमरावतीतून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका राज्यस्तरीय कुस्तीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कुस्तीपटूला अचानक उलट्या आणि पाय दुखण्याचा त्रास जाणवू लागला. तिची प्रकृती अधिक बिघडत चालली. नातेवाईकांनी तातडीने तिला रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुस्तीपटूच्या अकाली निधनानंतर क्रीडा प्रेमींनी आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

प्राप्ती सुरेश विघ्ने (वय वर्ष २२) असे मृत तरूणीचे नाव आहे. ती अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तीला अचानक उलट्या आणि पाय दुखण्याचा त्रास जाणवू लागला. तिने आपल्या भावाला फोन करून “मी घरी येत आहे” असे सांगितले. भावाने तिला सकाळी अमरावतीहून घरी आणले. घरी विश्रांती घेत असतानाच अचानक तिची प्रकृती अधिकच बिघडली.

Amravati
12th HSC Result: संतोष देशमुखांची लेक झाली पास! बारावीला मिळाले इतके गुण, कुटुंबियांचे डोळे डबडबले

प्रकृती बिघडल्यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. मृत घोषित केल्यानंतर तरूणीच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. दररोज व्यायाम करणारी, अतिशय तंदुरुस्त आणि राज्यस्तरावर कुस्ती खेळणाऱ्या प्रतिभावान खेळाडूच्या अकाली निधनानंतर गावाभरातूनही शोक व्यक्त केला जात आहे.

Amravati
Dr. Valsangkar: डॉ. वळसंगकर प्रकरणाचं गूढ वाढलं, सून आणि तिचे वडील परदेशात रवाना, नेमकं कारण काय?

प्राप्तीच्या अकाली जाण्याने तिवसा शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, अनेक क्रीडा प्रेमींनी आणि नागरिकांनी तिच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

Amravati
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींना २१०० देता येणार नाहीत', महायुती सरकारमधील नेत्यानं स्पष्टच सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com