VIDEO : ठाण्यात भरचौकात राडा, दुचाकीस्वार ५ वाहतूक पोलिसांना आवरला नाही, लाथा घातल्या

Thane Traffic Police Dispute: ठाण्यामध्ये एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांना जबर मारहाण केली. विना हेल्मेट असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे संतापलेल्या चालकाने पोलिसालाच मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय.
Traffic Police
Thane News
Published On

Thane Crime News : ठाण्यातील वाघबील ब्रिज चौकात वाहतूक पोलीस आणि दुचाकीस्वारामध्ये जोरदार राडा झाला. हेल्मेट घातलं नसल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती, त्याला दुचाकीस्वाराने विरोध केला. संतापलेला दुचाकीस्वार चक्क पोलिसांवरच धावून गेला. दुचाकीस्वार पाच पोलिसांना आवरला नाही. त्याने एका पोलिसाला लाथा मारल्या. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. ठाण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पोलिसांनी याप्रकरणी ५६ वर्षीय अनिरुद्ध कुवाडेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला घटनास्थळावरून अटक केली असून कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये नेहण्यात आलेय. अनिरुद्ध कुवाडेकर हा हेल्मेटशिवाय प्रवास करत होता, त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. पोलिसांनी त्याचा चालान भरायाला सांगितले, त्यावेळी त्याचा पारा चाढला. अनिरुद्ध याने वाहतूक पोलिसालाच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ड्युटीवर असणाऱ्या इतर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.

अनिरुद्ध कुवाडेकर हा मोटरसायकल नंबर MH04LG5037 वरती विना हेल्मेट प्रवास करत होता. त्यावेळी त्याच्यावरती नियमानुसार विना हेल्मेट ई चलन मशीन द्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईचा राग मनात धरून त्याने वाहतूक पोलिसासोबत वाद घातला. अनिरुद्ध कुवाडेकर याने ड्युटीवर असणाऱ्या चार पोलिसांसोबत वाद घातला, एकाला मारहाण केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पोलिसांनी नेमकं काय म्हटले ?

आज रोजी वाहतूक नियंत्रण कक्ष ठाणे यांच्या आदेशाने स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आले होते. त्याअंतर्गत पीएसआय यादव व चार पोलीस कर्मचारी वाघबील ब्रिजखाली विशेष कारवाई करीत होते. त्यावेळी एक इसम मोटरसायकल नंबर MH04LG5037 वर विना हेल्मेट आला. त्याच्यावरती नियमानुसार विना हेल्मेट इ चलन मशीनद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईचा राग मनात धरून वाहतूक पोलिसासोबत वाद घातला अन् झटापट केली. अनिरुद्ध कुवाडेकर याला या प्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलाय. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com