False Advertising : परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली फसवणूक; मुंबई नजीक भागातील अनधिकृत बांधकामांच्या जाहिराती, कुठे? वाचा

titwala news : टिटवाळ्यात परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली फसवणूक सुरु आहे. मुंबई नजीक टिटवाळ्यात अनधिकृत बांधकामांच्या जाहिराती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.
परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली फसवणूक; मुंबई नजीक भागातील अनधिकृत बांधकामांच्या जाहिराती, कुठे? वाचा
False AdvertisingSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

टिटवाळा : कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे कल्याणजवळील टिटवाळा शहरात अनधिकृत चाळींचे साम्राज्य उभे केले जात असल्याचे समोर येत आहे. या अनधिकृत चाळींच्या विरोधात अनेकवेळा तक्रारी करून देखील कल्याण महापालिकेच्या बांधकामा विभागाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या रिंग रोडच्या दुतर्फा या चाळी फोफावत असल्याचे दिसून येत आहे.

टिटवाळ्यात भूमाफियांचा चाळींच्या जाहिराती कमी किंमतीत घरे, हप्त्यावर घरे, स्वस्त घरांच्या नावाखाली सोशल मीडियावर फसवणूक सुरू आहे. या जाहिरातींना भुलून या चाळींमध्ये घर घेणाऱ्या सामान्य नागरिकांची खुलेआम फसवणूक सुरू असल्याचे दिसत आहे. याबाबत कल्याण महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी अनधिकृत बांधकामाची सोशल मीडियावर जाहिरात करणाऱ्यांविरोधात कारवाई करू. तसेच याबाबत सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याच्या सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.

परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली फसवणूक; मुंबई नजीक भागातील अनधिकृत बांधकामांच्या जाहिराती, कुठे? वाचा
Titwala News: बहिणीवर वाईट नजर असल्याचा संशय, मुलाने सावत्र बापाचा काढला काटा

काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे करण्यात येणाऱ्या जाहिरात पाहून कल्याण महापालिकेच्या संबंधित बांधकामावर कारवाई केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा कारवाई थंडावली आहे. त्यामुळे परिसरात चाळींची बांधकामे फोफावत आहेत. या चाळीवर कल्याण-महापालिकेकडून कारवाईचा दिखावा केला जातो. या चाळीच्या माध्यमातून दोन भिंती, जोत्यावर कारवाईचा फार्स तयार केला जातो. कारवाई पथकाची पाठ फिरताच भूमाफियांकडून पुन्हा जोमाने अनधिकृत बांधकामांची कामे सुरू केली जातात.

परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली फसवणूक; मुंबई नजीक भागातील अनधिकृत बांधकामांच्या जाहिराती, कुठे? वाचा
Titwala News: पत्नीची हत्या केल्यानंतर केला आत्महत्येचा बनाव; पोलिसांनी अवघ्या 2 तासात पतीचा केला पर्दाफाश

कल्याण महापालिकेशी संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत असल्याने ही बांधकामे फोफावत आहेत. या बांधकामावर कारवाईसाठी कल्याण महापालिकेला मुहूर्त मिळणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com