राजेश माेबाईल्सवर चाेरट्यांची पुन्हा नजर; आयफोन १३ वर डल्ला

rajesh mobile ambernath
rajesh mobile ambernath
Published On
Summary

या चोरीप्रकणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. अद्याप एफआयआर नोंदवलेली नाही. ती नाेंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अंबरनाथ : अंबरनाथ येथे शनिवारी पहाटे अज्ञाताने राजेश मोबाईल्स या नामांकित मोबाईल शाॅपीचे ग्रील तोडून सुमारे २२ लाख रुपयांचे माेबाईल चाेरुन नेले. याबाबतची घटना सकाळी निदर्शनास येताच दुकानाचे मालक राजेश नागडा यांनी पाेलिसांत धाव घेतली. theft-in-rajesh-mobile-ambernath-iphone13-12-samsung-crime-news-sml80

rajesh mobile ambernath
सेनेने मोदींचा फोटो वापरून निवडणुकीत यश मिळवले : आशिष शेलार

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी : राजेश माेबाईल या दुकानातील सगळेच्या सगळे महागडे मोबाईल घेऊन एक जण पसार झाला आहे. यामध्ये ऍपल आयफोन १३ apple iphone 13, आयफोन १२ iphone 12, सॅमसंग झेड samsung Z फोल्ड असे महागडे मोबाईल तसेच ऍपल आणि सॅमसंग यांचे स्मार्टवॉच smart watch आणि महागडे हेडफोन्स headphones यांचाही समावेश आहे.

दरम्यान दुकानात ग्राहकांना दाखवण्यासाठी कंपनीने दिलेले डेमो पीस देखील लंपास केले. संबंधित चोरट्याने दुकानाची तिजोरी देखील फाेडण्याचा, चावीने उघडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्याला यश आले नाही. यामुळे तिजोरीत असलेले महागडे मोबाईल्स राहिले अशी माहिती दुकानदार राजेश नागडा यांनी दिली. दरम्यान संबंधित चोरटा तब्बल अडीच ते तीन तास दुकानात होता असा दावा नागडा यांनी केला आहे. दरम्यान चाेरट्याने सीसीटीव्हीच्या डीव्हीआर सुद्धा काढून नेल्याने चाेरटा सराईत असल्याचे लक्षात येत आहे.

दरम्यान राजेश मोबाईल्समध्ये rajesh mobile ambernath ३ महिन्यांपूर्वीही अशीच चोरी झाली होती. ज्यामध्ये साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. पुन्हा येथे चाेरी झाल्याने स्टेशन परिसरातल्या व्यापारी संतापले आहेत. या परिसरात वारंवार चोऱ्या होत असताना पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी जाेर धरु लागली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com