सेनेने मोदींचा फोटो वापरून निवडणुकीत यश मिळवले : आशिष शेलार

ashish shelar
ashish shelar
Published On

मावळ : राज्यातील तीन पक्षांत विसंवादाची लढाई सुरु झालेली आहे. दोन पक्षांचे संकेत जे आमच्याकडे येताहेत. या सर्वाचा अभ्यास केला तर राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते असे वक्तव्य भाजप नेते व माजी मंत्री आशिष शेलार यांनी मावळ येथे केले. मावळ येथील भाजपाच्यावतीने आयोजिलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात श्री. शेलार बोलत होते. bjp-leader-ashish-shelar-says-elections-will-be-soon-in-maharashtra-sml80

ashish shelar
स्मृती, आम्हांला तुझा खूप अभिमान वाटतो! सांगलीकरांचा जल्लाेष

शेलार म्हणाले राज्यातील सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असलेले सरकार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस हा घोटाळेबाज, काँग्रेस हा झोलबाज आणि शिवसेना हा दगाबाज असे हे तीन पक्षांचं राज्यातील सरकार आहे. सेनेने मोदींचा narendra modi फोटो वापरून निवडणुकीत यश मिळवले. निवडणूक संपल्यानंतर दगेबाजी केली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष दगाबाजच असणार अशी खरमरीत टीका आशिष शेलारांनी केली.

एकविरा गडाचा विकास खूंटला

दगेबाजी करून सरकारमध्ये बसले तरी विकास काहीच केला नाही.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुलदैवत असलेल्या मावळ येथील कार्ला एकविरा देवी परिसराचा विकास करता आला नाही यापेक्षा काय दुर्देव म्हणावे लागेल. सत्ता उपभोगत असताना कार्लाकडे दुर्लक्ष केले. मग राज्याचे काय असेल..? स्वतःच्या कुलदैवतासाठी आणि आमच्या एकविरासाठी तरी मुख्यमंत्र्यांनी कार्ला एकविरा गडाचा विकास करावा अशी बाेचरी टीका शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com