जयश्री मोरे
मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या Mumbai Muncipal Corporation राजावाडी रुग्णालयात Rajawadi Hospital अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने Rat कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्रीनिवास यल्लपा असे या रुग्णाचे आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी Family केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हा प्रकार घडला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. The patient's eyes were bitten by a rat
दोन दिवसांपूर्वी श्रीनिवास यल्लपा याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे.याबाबतचे उपचार घेत असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडले असल्याचे समोर आले आहे.
हे देखील पहा -
याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला विचारले असता तिने उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.तर सदर चा आयसीयु रूम हा तळ मजल्यावर असल्याने इथे उंदरांचा वावर आहे आणि प्रथम दर्शनी ते उंदराने चावा घेतला असल्याचे दिसत असून या बाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी दिली आहे.
उंदराने डोळ्याचा खालचा भाग कुरतडला असावा अशी शक्यता आहे. डॉक्टरांनीही शक्यता नाकारली नसल्याने पालिकेच्या रुग्णालयात नेमके काय चालले आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर आयसीयू वॉर्डमध्ये असा प्रकार होत असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.