विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलै पासून

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ आणि ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलै पासून
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलै पासूनSaam Tv
Published On

वैदेही काणेकर

मुंबई - कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई Mumbai येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी council monsoon session ५ आणि  ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. legislature assembly and council monsoon session 2021

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्रीमंडळातील सदस्य, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य,  संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशनच्या कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी विधानभवन, मुंबई येथे ३ आणि ४ जुलै रोजी RT-PCR कोरोना चाचणीसंदर्भात व्यवस्था करण्यात येणार आहे.legislature assembly and council monsoon session 2021

तसेच गर्दी होवू नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे वाहनचालक, स्वीय सहायक व सुरक्षा रक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेर करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्या सोबत एका अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार. तसेच अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश नसणार आहे. याचबरोबर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांना देखील मर्यादित स्वरूपात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरी येथे देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार आहे. या किट मध्ये फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझरची एक बॉटल असणार आहे.legislature assembly and council monsoon session 2021

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलै पासून
खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !

दरम्यान, यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचे नाही अशी मानसिकता सरकारची आहे. केवळ 3 दिवसांचे अधिवेशन घेण्याची सरकारची तयारी आहे. शेतकरी अडचणी, विजेचे गंभीर प्रश्न आहेत पण सरकारला काहीही त्यांचे पडलेले नाही. कायदा सुव्यास्थेची स्थिती बिकट आहे पण सरकार चर्चा करण्याची तयारी नाही.

 मराठा आरक्षणा बाबत विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी असताना देखील सरकार अधिवेशन घेण्याच्या तयारी नाही. राज्यपालांनी पत्र देऊन देखील आतापर्यंत अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. संविधानाने दिलेले नियम सरकारला पाळायचे नाही असा देखील आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com