Mumbai Crime: वर्सोवातील सात बंगला सागर कुटीर समुद्रकिनारी भागात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

मुंबईच्या वर्सोवा समुद्रात ७ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. सात बंगला सागर कुटीर किनाऱ्यावर काम करणाऱ्या कामगाराने पोलिसांना माहिती दिली.
Mumbai Crime
Mumbai Crimegoogle
Published On

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडे वर्सोवा समुद्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ७ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सात बंगला सागर कुटीर समुद्र किनारी भागात एक मृतदेह पाण्यात तरंगला असल्याचे कोस्टल मार्गावर काम करणाऱ्या कामगाराकडून वर्सोवा पोलिसांना कळविण्यात आले.

या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमित जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक कोळी बांधवांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी महापालिकेच्या विलेपार्ले येथील कृपा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांकडून मृताचे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Mumbai Crime
Maharashtra Politics: धसांच्या खोक्याला शिकारीचा नाद; खोक्याने मारले हरिण, काळवीट आणि मोर, पाहा स्पेशल रिपोर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वर्सोवा सात बंगला समुद्रकिनारी भागात कोस्टल रोडचे काम सुरू आहे. या ठिकाणी काम करत असणाऱ्या कामगारांना सागर कुटीर या वस्तीपासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. या कामगारांनी याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्याला मोबाईल वरून कळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी एपीआय अमित जाधव आणि त्यांच्या टीमला सूचना करून मृतदेह कोळी बांधव आणि समुद्रकिनाऱ्यावरील जीव रक्षकांच्या मदतीने बाहेर घेऊन येण्याच्या सूचना केल्या.

Mumbai Crime
Beed Marriage: ‘एका लग्नाची गोष्ट’, अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकास्पद काम

पोलिसांनी समुद्रात तरंगत असलेला तो मृतदेह जीव रक्षक आणि कोळी बांधवांच्या मदतीने किनाऱ्यावर आणला. मृत व्यक्तीला कोणी मारून समुद्रात घेतले किंवा त्याचा बोलून मृत्यू झाला याबाबत पाहणी सुरू केले. भुताच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम किंवा महाराणीचे निशाण असल्यामुळे ती व्यक्ती पाण्यात बुडून मृत्यू झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे भुताच्या अंगावर टी-शर्ट आणि शॉर्ट असा पोशाख होता व त्याच्या हातात सोनाटा कंपनीचे घड्याळ असल्याची माहिती देखील एपीआय अमित जाधव यांनी दिली आहे. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पालिकेच्या रुग्णालयात नेला असून मृतदेहाबाबतची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना कळविले आहे याप्रकरणी वर्सोवा पोलीस अधिक तपास करत आहेत

Mumbai Crime
Women's Day Special: छोट्या शहरातील तरुणीची भरारी; मॉडेलिंग क्षेत्रात घडवले करिअर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com