ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यंदाच्या पावसाळ्यानंतर झालेला कमी पाऊस, अलनिनोचा प्रभाव आणि ऑक्टोबर २०२६ मध्ये मान्सूनने घेतलेली माघार यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, शासन निर्णयानुसार ठाण्यात १० टक्के पाणी कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे (काही भागांत) प्रभाग समित्यांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (MIDC) पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामार्फत होणारा पाणीपुरवठा गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपासून ते शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत, म्हणजेच सलग २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.
पाणी कपातीच्या या २४ तासांच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत कोणत्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील?
दिवा प्रभाग समितीचे सर्व भाग.
मुंब्रा प्रभाग समिती (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळून).
कळवा प्रभाग समितीचे संपूर्ण क्षेत्र.
वागळे प्रभाग समितीअंतर्गत येणारे रुपादेवी पाडा, किसननगर नं. २ आणि नेहरुनगर.
मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत येणारा कोलशेत खालचा गाव परिसर.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
ठाणे महानगरपालिका नियोजित २४ तासांचा शटडाऊन संपल्यानंतर जेव्हा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, तेव्हा पुढील 1-2 दिवस संबंधित परिसरांमध्ये पाणी कमी दाबाने उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांनी ऐन वेळी पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच या २४ तासांच्या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.