जमीन खरेदी-विक्री करताना अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, कुटुंबातील इतर सदस्यांची संमती घेणे आवश्यक आहे का? पत्नी, मुल किंवा भावंडांनी जमीन विकण्यास विरोध केला, तर विक्री थांबवता येते का? याचे उत्तर जमिनीच्या मालकी हक्कावर आणि तिच्या प्रकारावर अवलंबून असते.
एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या पैशातून जमीन खरेदी केली असेल आणि त्यावर इतरांचा कायदेशीर हक्क नसेल तर ती व्यक्ती कुटुंबियांच्या परवानगीशिवाय जमीन विकू शकते. मात्र जमिनीवर संयुक्त मालकी हक्क किंवा कोर्टाची स्थगिती असल्यास नियम वेगळे असू शकतात.
वडिलोपार्जित किंवा सगळ्या कुटुंबाच्या मालमत्तेत इतर सदस्यांचे कायदेशीर हिस्से असतील, तर एक व्यक्ती संपूर्ण जमीन मनमानी पद्धतीने विकू शकत नाही. स्वतःच्या हिस्स्यापेक्षा अधिक जमीन विकण्याचा अधिकारही नसतो. मात्र काही परिस्थितीमध्ये कायद्यानुसार सगळ्या कुटुंबाचा कर्ता पुरुष/महिला विशिष्ठ कारणांसाठी मालमत्ता विकू शकतो.
वडिलांनी स्वतःच्या पैशातून खरेदी केलेल्या मुलांना केवळ नात्याच्या आधारावर हक्क मिळत नाही. मात्र पूर्ण वडिलोपार्जित मालमत्तेत कायदेशीर अधिकार लागू होऊ शकतात. हिंदू उत्तराअधिकार कायद्यानुसार पात्र परिस्थितीत मुलीलाही मुलाप्रमाणे समान हक्क मिळतो.
जमीन जर दोन तीन भावांच्या नावावर असेल तर इतर सहमालकांच्या हिस्स्याची विक्री त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र जमीन एका जणाची स्वतंत्र मालमत्ता असेल आणि पत्नी किंवा भावंडांचा कायदेशीर हिस्सा नसेल, तर त्यांची संमती आवश्यक नसते.
जमीन विकण्यापूर्वी खरेदीखत, सातबारा उतारा, फेरफार नोंदी, वाटणीपत्र आणि न्यायालयीन वादांची तपासणी करावी. केवळ सातबारा उताऱ्यावर नाव असणे म्हणजे प्रत्येक प्रकरणात अंतिम मालकी सिद्ध होणे नाही. जमीन विकण्यासाठी प्रत्येक वेळी कुटुंबाची संमती आवश्यक नसते. मात्र, मालकी हक्क किंवा हिस्स्याबाबत वाद असल्यास कागदपत्रांची तपासणी करून वकिलाचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.