Thane : ठाणे ते नवी मुंबई विमानतळ फक्त ३० मिनिटात, ८००० कोटींचा खर्च, सरकारचा मास्टारप्लान काय?

Thane to Navi Mumbai Elevated Corridor : ठाणे आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी राज्य सरकार नवीन रस्ता तयार करणार आहे. २६ किमीच्या या रस्त्यासाठी ८००० कोटी रूपये खर्च होणार आहे.
Navi Mumbai Airport
Navi Mumbai AirportSaam Tv
Published On

Thane to Navi Mumbai Airport in Just 30 Minutes : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) जून २०२५ मध्ये सुरू होणार आहे, त्यासाठी राज्य सरकारकडून कनेक्टिविटी वाढवण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळ ते ठाणे यादरम्यान २६ किमीचा एलिव्हेटेड कॉरिडोअर तयार करण्यात येणार आहे. कोरिडोरमुळे ठाणे ते नवी मुंबई यामधील प्रवासाचा वेळ वाचणार आहे. नवीन एलिव्हेटेड कॉरिडोअर तयार झाल्यानंतर हा प्रवास फक्त ३० मिनिटात (Thane to NMIA in 30 Minutes) पूर्ण होणार आहे. यामुळे तासभर वेळ वाचणार आहे. सध्या ठाणे ते नवी मुंबई विमानतळ यादरम्यान प्रवासासाठी दीड तास लागतात. नवीन २६ किमीच्या एलिव्हेटेड कॉरिडोअरसाठी सरकारकडून ८००० कोटी खर्च केले जाणार आहे.

CIDCO आणि MMRDA तयार करणार २६ किमीचा एलिव्हेटेड कॉरिडोअर

ठाण्याला नवी मुंबईसोबत जोडणारा २६ किमीचा एलिव्हेटेड कॉरिडोअर सिडको आणि MMRDA मिळून तयार करणार आहेत. त्यासाठी ८ हजार कोटींचा खर्च होणार आहे. ठाणे ते नवी मुंबई विमानतळावर पोहचण्यासाठी सध्या पाम बीच आणि ठाणे बोलपूर रोडचा वापर केला जातोय. पण या दोन्ही मार्गावर मोठी वाहतूककोंडी असते, त्यामुळे प्रवाशांचा वेळ खूप जातो.

Navi Mumbai Airport
Navi mumbai Cidco : २५ लाखांत घर, सिडको धमाका उडवणार, ६७२३५ घरं तयार, लॉटरी कधी निघणार?

नवीन कॉरिडोअर हा ठाणेतील पटनी चौकातून सुरू होणार आहे. तो नवी मुंबई विमानतळाला जोडला जाणार आहे. ठाण्यातून सुरू होणारा हा मार्ग बेलापूररोडच्या समांतर १७ किमी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ किमी वाशी ते एनएमआयपर्यंत डबल डेकर एलिव्हेटड रोड असेल.

Navi Mumbai Airport
Navi Mumbai CIDCO : सिडको ६७,२३५ घरांची लॉटरी कढणार, नवी मुंबईमध्ये हक्काचे निवारा मिळणार, किंमत किती?

ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडला जाणारा या कॉरिडोअरमुळे प्रवास अधिक आरामदायी असेल. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी असते, त्यामुळे ठाणे-नवी मुंबई या प्रवासासाठी ९० मिनिटे लागतात. नव्या कॉरिडोअरमुळे या प्रवासाचा वेळ फक्त ३० मिनिटांवर येणार आहे.

एलिव्हेटेड कॉरिडोअरचा अहवाल तयार कऱण्यात आला आहे. त्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड केली जाणार आहे. जून २०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई-ठाणे यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी आणि सुविधा वाढविण्यासाठी, सिडको आणि एमएमआरडीए यांनी अनेक पायाभूत प्रकल्प सुरू केले आहेत. यामध्ये ठाणे-नवी मुंबई विमानतळासाठी एलिव्हेटेड कॉरिडोअरचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com