शिवसेनेची दादागिरी! उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला
शिवसेनेची दादागिरी! उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण
शिवसेनेची दादागिरी! उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाणSaam Tv
Published On

ठाणे : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र, ठाण्यात एक असा व्हिडीओ समोर येत आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. ठाण्यात शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करुन, त्या बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. बंदमुळे टीएमटीची सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे लोकांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम रिक्षाचालक करत आहेत.

हे देखील पहा-

मात्र, बंद पुकारला असताना देखील रिक्षा चालवत असल्याच्या कारणावरुन स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण करत असल्याची घटना निर्दशनास आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ठाण्यातील बंदला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ठाण्याचे शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी देखील या मारहाणीत सहभागी असल्याचे बघायला मिळाल आहे. केवळ रिक्षाच सुरु असल्यामुळे बंद पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक देखील यावेळी आक्रमक झाले आहेत.

शिवसेनेची दादागिरी! उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण
सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने

जांभळी नाका परिसरात रिक्षाचालकांना मारहाण करण्याचा हा प्रकार घडला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असल्यामुळे ठाण्यात या बंदच्या समर्थनार्थ शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर उतरले आहे. महापौर नरेश म्हस्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकतें रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाण्यात महत्वाच्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com