मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र केलं, मुख्याध्यापिकेवर बडतर्फीची कारवाई; पोलिसांकडून अटक

Shahapur Damania English School : शहापूर शहरातील आर. एस. दमानिया इंग्लिश स्कूलमध्ये ३००च्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत. काल बुधवार रोजी सकाळी १० ते १२च्या सुमारास महिला मुख्यध्यापिकेने मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावलं.
Shahapur Damania English School
Shahapur Damania English SchoolSaam Tv News
Published On

ठाणे : एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित आर. एस. दमानिया इंग्लिश स्कूलमध्ये घडला. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी, एक शिपायाचा समावेश आहे. तर मुख्याध्यापिकेवर बडतर्फीची कारवाई केली पोलिसांकडून तिला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर शहरातील आर. एस. दमानिया इंग्लिश स्कूलमध्ये ३००च्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत. काल बुधवार रोजी सकाळी १० ते १२च्या सुमारास महिला मुख्यध्यापिकाने मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावलं. त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरुमच्या लादीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले.

Shahapur Damania English School
Nishikant Dubey Mumbai Connection : मराठी माणसाला धमकी देणाऱ्या निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन; कोट्यवधींची प्रॉपर्टी, नोकरीही केली

मासिक पाळी आली आहे किंवा नाही याबाबत विचारणा त्यांनी विद्यार्थिनींकडे केली. त्यानंतर ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास ५ शिक्षिकाना सांगितलं. तसेच ज्या मुली त्यांना मासिक पाळी आली नाही, असं सांगतात त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे आदेश महिला कर्मचाऱ्यांना दिले.

या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी आज गुरुवारी शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकराचा जाब विचारत गोंधळ घातला. दुसरीकडे इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल, अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप केला आहे.

Shahapur Damania English School
Politics: 'च्याXXX गद्दार कुणाला म्हणतो, तुला दाखवतोच' ठाकरे अन् शिंदेंच्या शिलेदाराची हमरी तुमरी; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com