Thane Station: ठाणे रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार! ११ मजली टॉवर उभारणार, पार्किंगचा प्रश्न कायमचा मिटणार

Thane Station Modern Look: ठाणे स्टेशनचा लवकरच कायापालट होणार आहे. ठाणे स्टेशनच्या बाजूला ११ मजली इमारत उभी राहणार आहे. यामध्ये पार्किंगसाठी वेगळी जागा देण्यात येणार आहे.
Thane Station
Thane StationSaam Tv
Published On

ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. ठाणे स्टेशनवर कधीही जा गर्दी असतेच. त्याशिवाय पार्किंगचा प्रश्नही गंभीर आहे. ठाणे स्थानकावरील सर्व समस्यांचा तोडगा निघणार आहे. ठाणे रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे. पुनर्विकासात येथे ११ मजल्यांचा भव्य टॉवर उभारण्यात येणार आहे.

Thane Station
Pune Metro: पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?

कायापालट झाल्यानंतर ठाणे स्टेशन हायफाय अन् मॉर्डन होणार आहे. पार्किंग, हॉटेल, दुकानासह अनेक सोयी सुविधा ठाणे स्थानकावर मिळतील. लोकांच्या समस्या लक्षात घेता ११ मजली इमारात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे आणि ठाणे महापालिका या स्थानकाचा 'मल्टीमॉडेल ट्रांझिट हब' म्हणून विकास करत आहे.

ठाणे स्टेशनवर होणाऱ्या या ११ मजली टॉवरमुळे चांगला महसूल गोळा होणार आहे.सर्वकाही गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या टॉवरचे काम ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण होऊ शकते. ठाणे स्टेशनच्या १०A च्या जवळ असलेल्या ९००० स्क्वेअर मीटरमध्ये हा प्रोजेक्ट होणार आहे.

या नवीन टॉवरमध्ये पार्किंग आणि इतर सर्व्हिसेसचा समावेश आहे. याचसोबत रेल्वेसाठी अनेक सुविधा असणार आहे. तसेच कॉनकोअर्स लेव्हलवर बस वाहतूकीसाठी जागा असणार आहे. तळमजला आणि पोट मजल्यावर रेल्वे सुविधा आणि कॉनकोर्स फ्लोअर प्रवासी बसेससाठी असणार आहे. तसेच आठ अतिरिक्त मजल्यांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे.

Thane Station
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! घाटकोपर- अंधेरी विशेष मेट्रो धावणार; कधीपासून सुरू होणार?

अनेक रिटेल शॉप, फुड कोर्ट आणि रेस्टॉरंट, गेमिंग झोन, कोचिंग इन्स्टिट्युट, हॉटेल आणि सर्व्हिस अपार्टमेंटचा समावेश आहे. हा टॉवर ईस्टर्न एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे. फक्त २.२४ किलोमीटर अंतरावर हा एक्सप्रेस वे आहे. तसेच बससाठी स्पेशल जागा ही प्लॅटफॉर्म १०च्या जवळ दिली जाणार आहे. मल्टी मॉडेल ट्रांझिट हब अंतर्गत बस, रेल्वे आणि मेट्रो जोडली जाणार आहे.

Thane Station
Vande Bharat Express: मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार, कोण कोणती स्थानकं असणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com