Kalyan News
Kalyan News Saam tv

Kalyan News : ६५ बेकायदा इमारत प्रकरण; इमारतींच्या जमिनीचा सातबारा देखील बनावट, महसूल विभागाची फसवणूक

Kalyan : कल्याण- डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात संबंधित बिल्डरांनी महानगरपालिकेचे खोटे शिक्के, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या वापरून बनावट कागदपत्रे सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले
Published on

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली परिसरातील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहारात कल्याण प्रांत कार्यालयाची देखील फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या इमारतींसाठी खोटे सातबारा उतारे आणि बनावट नकाशे वापरण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी रामनगर पोलिसांना खोटे कागदपत्र बनवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  

कल्याण- डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात संबंधित बिल्डरांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे खोटे शिक्के, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या वापरून बनावट कागदपत्रे सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले होते. या इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. एसआयटी मार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र हा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

Kalyan News
Crime : रस्ता अडवून बर्थ डे सेलिब्रिशेन, एकाने हटकलं, ७-८ जणांनी बेदम चोपले

बनावट सातबारा उतारा असल्याचे उघड 

दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेत या ६५ इमारतींमधील काही इमारतींचे सातबारा बनावट असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच संबंधित कागदपत्र प्रांत अधिकाऱ्यांना दिली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रांत कार्यालयाने याची चौकशी सुरू केली. या चौकशी दरम्यान डोंबिवलीतील आयरे गावातील एका इमारतीसाठी बनावट सातबारा उतारा तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

Kalyan News
Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठलाच्या मूर्तीची झीज; मूर्तीवर लवकरच इपॉक्सी लेप

गुन्हा दाखल होणार 

याप्रकरणी कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी रामनगर पोलिसांना संबंधित बनावट कागदपत्र बनवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्यात बिल्डर आणि खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीविरोधात गुन्हा दाखल होणार असून या प्रकरणात आणखी सखोल चौकशी सुरू आहे. तर यात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com