Crime : रस्ता अडवून बर्थ डे सेलिब्रिशेन, एकाने हटकलं, ७-८ जणांनी बेदम चोपले

Ulhasnagar Crime News: ६ मार्च रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत गोलमैदान याठिकाणी जेवण आणण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यातील भीमनगर भागात काही तरुण रस्ता अडवून वाढदिवस साजरा करत होते.
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : आता रस्त्याने जाणे देखील कठीण झाले आहे. याची प्रचिती उल्हासनगरमध्ये आली आहे. संपूर्ण रस्ता अडवून रस्त्याच्या मधोमध उभे राहून केक कापण्याचा कार्यक्रम केला जात होता. वापरण्यास देखील जागा नव्हती. यामुळे रस्त्याने जाणाऱ्या एकाने जाण्यासाठी जागा मागितल्याचा राग आला. यातून सदर इसमास सात ते आठ जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संतोष नाईकवाडे असं गंभीर जखमी झालेल्या कामगाराचं नाव आहे. संतोष हे सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामाला होते. दरम्यान संतोष नाईकवाडे हे ६ मार्च रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत गोलमैदान याठिकाणी जेवण आणण्यासाठी जात होते. यावेळी उल्हासनगरमध्ये रस्त्यातील भीमनगर भागात काही तरुण रस्ता अडवून वाढदिवस साजरा करत होते. याठिकाणी रस्त्याच्या मधोमध केक कापण्याचा कार्यक्रम सुरु होता. 

Ulhasnagar News
Ulhasnagar Crime : जुन्या भांडणातून दोन गट भिडले; एकमेकांवर चढविला हल्ला, चारजण गंभीर जखमी

जाण्यासाठी जागा मागितल्याचा राग 

दरम्यान रस्ता अडवून बर्थ डे सेलिब्रेशन सुरु असल्याने जाण्यासाठी देखील रस्ता नव्हता. यामुळे संतोष आणि त्याच्या मित्रांनी या टोळक्याला जाण्यासाठी रस्ता मागितला. जाण्यासाठी जागा मागितल्याचा राग आला. यावरून त्यांच्यात वाद होऊन वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांनी लोखंडी फायटर आणि तलवारीने संतोष यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामुळे येथे गोंधळ निर्माण झाला होता.

Ulhasnagar News
Akola News : तुरीचा ट्रॅक्टर उलटला, मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेचा मृत्यू

हल्ल्यात इसम गंभीर जखमी 

दरम्यान टोळक्याने तलवारीने केलेल्या हल्ल्यात संतोष नाईकवाडे यांचं बोट निकामी झालं असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर सोबत असलेल्या मित्रांनी संतोष यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यांच्यावर सध्या उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com