
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी, यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली आहे.ठाण्यात पॉड टॅक्सी सुरु करण्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणूरक असणार आहे. हा मेट्रो नेटवर्कसाठी पूरक असणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या विकास आढावा बैठकीत प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. कायदेशीर सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आयोजित केला जाईल.
पॉड टॅक्सीची वैशिष्ट्ये (Pod Taxi Features)
पॉड टॅक्सीचे हे जाळे ५२ किमीपपर्यंत लांब असणार आहे. यामध्ये ६३ स्थानके असतील. या पॉड टॅक्सीचे भाडे फक्त ३० रुपयांपासून सुरु असणार आहे. ही पॉड टॅक्सी परवडणारी असणार आहे. पीपीपी आधारावर प्रकल्प सुरु करण्यापूर्वी कायदेशीर मान्यता आणि इतर औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
ठाण्यात नेहमीच वाहतूक कोंडी असते. खराब रस्ते आणि पायाभूत सुविधा नसल्यामुळे ठाण्यात अनेक समस्या आहेत. या गोष्टींवर तोडगा म्हणून अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. यामध्ये मेट्रो,पॉड टॅक्सीचा समावेश आहे. पॉड टॅक्सीमुळे प्रवास खूप सोपा आणि सुसाट होणार आहे . याचसोबत पॉड टॅक्सीचे भाडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.