
ठाणे जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यात पाणी साचलं आहे. जिल्ह्याला हवामान विभागानेही रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तर जिल्ह्यात काही ठिकाणी एनडीआरएफची टीम देखील तैनात करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं की, ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला. आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्या ऑरेंज अलर्ट आहे, परवा येलो अलर्ट आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी सूचना दिल्यानंतर आज दुपारी बैठक देखील पार पडली. जिल्ह्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यातला विशेष आढावा घेतला. जिल्ह्यात काल १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्टचा इशारा आहे. मुरबाड आणि ठाणे तालुक्यामध्ये सगळ्या टीमला सूचना देण्यात आल्या आहेत. सगळ्या टीम फिल्डवर असून सतर्क आहे'.
'मुरबाडमध्ये काल झालेल्या पावसामुळे शेतजमिनीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आजच्या पावसाचा आढावा घेऊन काल त्यावर पंचनामे करण्यात येईल असे आदेश देखील देण्यात येणार आहे. तानसासह सगळ्याच धरणातले मॉनिटरिंगसह भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडलेले आहेत. ठाणे ग्रामीण येथे तीन ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेला आहे. तिथे देखील टीम काम करत आहे. एनडीआरएफची टीम कल्याणमध्ये सतर्क आहे. सर्व प्रकारची टीम अलर्ट मोडवर आहे. दोन ते तीन दिवसांपासून पावसामुळे टीम सतर्क आहे, असे त्यांनी सांगितले.
'सर्वच नद्यांची धोका पातळी आणि इशारा पातळीच्या खाली आहे. भातसाचे दरवाजे उघडलेले आहेत. त्याच्यानुसार पाणीची पातळी किती वाढू शकते. त्यानुसार त्या क्षेत्रामध्ये किती पाऊस आहे, त्याची सूचना आणि माहिती देण्यात येत आहे. अधिकृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. माहिती जनसंपर्क कार्यालयाचे फोन नंबर देखील देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत ,तलाठी यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. जुने फोटो असतील व्हिडिओ असतील. ते बघून कोणीही घाबरू नये. इशारा पातळी आणि धोका पातळी याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल. ४२ गावाची देखील आम्ही यादी काढलेली आहे. त्वरित त्या ठिकाणी टीम पोहोचशील आणि माहिती देतील, असे पाचांळ पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.