Kalyan News : कल्याण हादरलं! आश्रमात २७ मुलांवर शारीरिक, २ मुलींवर लैंगिक अत्याचार

Thane Kalyan News : ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमधील खडवलीमध्ये एका आश्रमात २९ मुलांवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या आश्रमाला भेट दिली.
Kalyan Thane News
Kalyan Thane Newssaam tv
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील खडवलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. खडवलीच्या एका बालक आश्रमात तब्बल २७ मुलांवर शारीरिक अत्याचार झाल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी आश्रमातील २ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. या घटनेची माहिती समोर आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उल्हासनगर येथील बालसुधार गृहाला भेट देण्यासाठी उल्हासनगरमध्ये आल्या होत्या. महिला आणि बालविकारस विभागातर्फे सुरु असलेल्या संस्थेत त्यांनी पीडित मुलांची विचारपूस केली. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी खडवलीतील बालक आश्रमातील पीडित मुलांची भेट घेतली.

Kalyan Thane News
Shivsena Shibir : संभाजी महाराजांचा संघर्ष शिवसेनेच्या वाट्याला! 'छावा'चा दाखला देत संजय राऊतांनी शिवसैनिकांमध्ये भरली ऊर्जा

मुलांच्या भेटीनंतर नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सदर मुलांवर झालेले अत्याचार अमानुष होते आणि या प्रकरणातील समोर आलेल्या पाच आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना माहिती देणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

Kalyan Thane News
Balasaheb Thackeray: माझ्या तमाम हिंदू बांधवांनो! तोच आवाज, तोच करारी बाणा..., बाळासाहेबांच्या खणखणीत भाषणातील एकेक शब्द जशाचा तसा, Video

नीलम गोऱ्हे यांनी खडवलीतील 'त्या' आश्रम शाळेची चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. आश्रमातील २७ मुलांवर शारीरिक अत्याचार आणि २ मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत देखील विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले. दरम्यान या घटनेमुळे खडवलीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Kalyan Thane News
Uddhav Thackeray : संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा; उद्धव ठाकरेंकडून ओपन चॅलेंज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com