
तोच आवाज, तोच करारी बाणा, ठस करून काळजात भिडणारे शब्द..., मुंबईतील शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यात घुमणारा बाळासाहेबांचा खणखणीत आवाज पुन्हा एकदा नाशिकमधील निर्धार मेळाव्यात ऐकू आला. पुन्हा एकदा हिंदू हृदयसम्राट व्यासीपाठावर उभे राहून भाषण करत आहेत, असा अनुभव मेळाव्यातील जनेतला आज आला.
शिवसेना ठाकरे गटाचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा होतोय. राज्यातील शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न या शिबीराच्या माध्यमातून ठाकरेंकडून करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी आज ठाकरे गटाकडून निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याच्या सुरुवातीला ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा एआयमार्फत भाषण सादर करण्यात आले, ऐका...
येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो! आज जर गर्दी जास्तच आहे. असणारच कारण नाशिक आणि शिवसेनेचं नातं खूप जुनं आहे. नरेंद्र मोदी म्हणतात तसं नाही, नाहीतर मोजी म्हणतात, नाशिक और मेरा पुराना नाता है, स्वातंत्र्यवीर सावरकर उनके साथ मैंने काम किया है, जॉक्सन कि हत्या में मेरी प्लॅनिग थी! असं मोदी जेथे नाही तेथे बोलत असतात, ते जातील तेथे गंडवत असतात. हे नाती जपणारी माणसं नाहीत.
कमळाबाई म्हणजे ढोंग आहे, भाजपला म्हणजेच जनता पक्षाला महाराष्ट्र आणि राज्यात कोणी ओळखत नव्हतं. तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला, त्यांना आधार दिला. महाराष्ट्रात आम्हीच त्यांना वाढलं. पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आलीय. २५ वर्ष आमचं एक नातं त्यांच्या बरोबर होतं. महाराष्ट्रात ते शिवसेनेमुळे वाढलेत. मग नातं तोडलं कोणी? असा सवाल बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय भाषणातून भाजपला करण्यात आला. माझ्या पोटडीत यांच्या बरीच गोष्टी आहेत, त्या हळू हळू काढतो त्याच मज्जा असते, नाही तर एकदम खेळ अटकून जाईल, आज नाशिकला जमला आहात. नाशिककर मला विसरून शकत नाहीतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.