Pakistani Honeytrap : पाकिस्तानचा हनी ट्रॅप, ठाण्याचा अभियंता अडकला; युद्धनौकांचे नकाशे मुलींना सोपवले

Pakistani Honeytrap Agent : देशाशी गद्दारी करणाऱ्या घरभेद्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेलाय. ज्योती मल्होत्रानंतर अनेकांना अटक झाली. त्यात आता भारतीय नौदलाची गुप्त माहिती चक्क पाकिस्तानी एजंटला पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नेमकं प्रकरण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Pakistani Honeytrap Agent
Pakistani Honeytrap Agentx
Published On

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या गद्दार युट्यूबर ज्योती मल्होत्रानंतर आता रवी वर्मा या अभियंत्याला एटीएसनं अटक केलीय. भारतीय नौदलाची गोपनीय माहिती रवी वर्मानं पाकिस्तानला पुरवली. पाकच्या मायाजाळात वर्मा अडकला होता. पाकची हेर असलेल्या महिला एजंटने रवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याच्याशी मैत्री केली. आणि भारतीय नौदलातील गुप्त माहिती व्हॉटसअॅपद्वारे मिळवली. ही गोपनीय माहिती पुरविल्यानंतर पाकिस्तानातून मोठी रक्कम वर्मा याच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आलीय. रवी वर्मानं पाकिस्तानला कशी माहिती पुरवली. पाहूयात...

Pakistani Honeytrap Agent
Mumbai Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक! प्रवाशांचे हाल होणार, रविवारी कशी असणार लोकलची स्थिती?

- ठाण्यातला रवी वर्मा, पाकचा एजंट

- ठाण्यातला रहिवासी, मुंबईत एका खाजगी कंपनीत इंजिनिअर

- कंपनी नौदलाच्या गुप्त ठिकाणी काही उपकरणांची कामं करते

- नौदलात सहज एक्सेस असल्यानं गुप्त माहिती, फोटो, व्हिडिओ पाकिस्तानला पाठवले

- नोव्हेंबर 2024पासून पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या संपर्कात

- याप्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल आणि एकाला अटक

Pakistani Honeytrap Agent
MI Vs GT Eliminator : मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सवर शानदार विजय! क्वालिफायर 2 मध्ये पंजाबशी भिडणार

गेल्या दोन वर्षांपासून रवी वर्मा हा पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या संपर्कात होता. पाकिस्तानी महिलेनं रवीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचं वर्मा कुटुंबियांचं म्हणणं आहे. यापूर्वीही हनी ट्रॅपच्या घटना घडल्या आहेत.

Pakistani Honeytrap Agent
Mi Vs GT : गुजरातला Eliminator मध्ये हरवलं तरीही IPL 2025 जिंकण्यापासून मुंबई राहणार दूर? आकडेवारीने टेन्शन वाढवलं

पाकिस्तानी 'हनी ट्रॅप', घरभेद्यांचे कारनामे

ऑक्टोबर 2020

हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचा सहायक पर्यवेक्षक दीपक शिरसाठ याला ISI ला माहिती पुरवल्याप्रकरणी अटक

4 मे 2023

पाकिस्तानी गुप्तचरांना माहिती पुरविल्याप्रकरणी डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक

12 डिसेंबर 2023

पाक एजंट्सना माहिती पुरवणाऱ्या डॉकयार्डमधील प्रशिक्षणार्थी तरुण पाटील याला अटक

12 मार्च 2024

डॉकयार्डमधील गुप्त माहिती पाक एजंटला पुरवणाऱ्या कल्पेश बायकरला अटक

Pakistani Honeytrap Agent
RCB च्या 'इ साल कप नमदे'साठी मुंबईचा पराभव आवश्यक; गुजरात टायटन्सच्या कामगिरीकडे लक्ष

भारताच्या नौदलाबद्दल गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी याआधीही एटीएसनं कारवाई केलीय. या सगळ्या प्रकरणात पाकिस्तानी हस्तकांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवून आरोपींना जाळ्यात ओढल्याचं बोललं गेलं. मात्र भारताबद्दलची माहिती पाकिस्तानी एजंटना देताना आरोपींना कोट्यावधी रुपयेही मिळालेत. पैशांच्या हव्यासापोटी देशाशी गद्दारी करुन घर पोखरण्याचा प्रयत्न करतायेत. अशा घरभेद्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. जेणेकरून भारतात राहून अशी हिंमत पुन्हा कोणीही करू शकणार नाही.

Pakistani Honeytrap Agent
Kalyan Bogus Doctor : डॉक्टर असल्याचा बनाव, तरीही रुग्णांवर उपचार, दोघांवर पालिकेची कारवाई; कल्याणमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com