Thane News: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! पूर्व-पश्चिम जोडणारा पूल कधी होणार? तारीख आली समोर

Thane East-West Bridge SATIS 2 Open In September: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पूर्व-पश्चिमेला जोडणारा ब्रिज लवकरच सुरु होणार आहे. ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे.
Thane News
Thane NewsSaam Tv
Published On
Summary
  • ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी

  • ठाणे पूर्व-पश्मिचेला जोडणारा पूल सप्टेंबरमध्ये होणार सुरु

  • स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीपासून होणार सुटका

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ठाणे स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत असणारा स्टेशन एरिया ट्राफिक इम्प्रुव्हमेंट म्हणजे सॅटीस प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. SATIS प्रकल्प हा ठाणेकरांसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे ठाणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सुखकर होणार आहे. हा प्रकल्प सप्टेंबर महिना अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी दिली आहे.

Thane News
Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

ठाणे शहराची पूर्व आणि पश्चिम बाजू जोडली जाणार (Thane East-West Bridge)

ठाणे शहराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला जोडणाऱ्या उड्डाण पूलासाठी गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. ४.५ मीटर लांबीचे पाच गर्डर बसवले आहे. तसेच रुळांवरील २.२ किमी लांबीच्या लिंक रोडचे काम पूर्ण होण्याचे मार्गावर आहे. यामुळे ठाणे स्टेशनच्या आजूबाजूची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असंही राजन विचारे यांनी सांगितले. त्यांनी या ठिकाणी जाऊन प्रकल्पाची पाहणी केली.

बस डेकचे काम (Thane Bus Deck Work In Progress)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,SATIS-2 चा एलिव्हेटेड मार्ग दोन महिन्यात पूर्ण होईल. ठाणे पूर्वच्या स्थानकाबाहेरील एलिव्हेटेड बस डेकचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे काम सुरु होण्यास अजून काही महिने लागेल. डेक बांधण्याचे काम सुरु आहे.डिसेंबरपर्यंत हे प्रवाशांसाठी खुला करण्याचे लक्ष आहे. या डेकचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत एलिव्हेटे रस्ते आणि रेल्वे पूल एकमेकांना जोडले जाणार आहे. यामुळे SATIS 2 चे काम सुरु होणार नाही. एकदा हे काम पूर्ण झाल्यानंतर तीन हात नाका आणि ठाणे स्टेशन पूर्वेकडील प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

सॅटीस प्रकल्प हा २०१८ मध्ये सुरु झाला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हा रस्ता बांधला जात आहे. यासाठी २९८ कोटी रुपयांचा निधी मंजूल झाला आहे. या कामासाठी ५९ खांब उभे केले आहे. फक्त गर्डर बसवण्याच्या कामाचा उशिर होत आहे. यासाठी रेल्वेवर मेगा ब्लॉकच्या काळात काम केले जाईल, असं राजन विचारे यांनी सांगितले आहे.

Thane News
Thane To Agra Travel: ठाण्याहून आग्राला कसे पोहोचायचे? वाचा रेल्वे, बस आणि पर्यायी मार्ग
Q

सॅटीस प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होईल?

A

सॅटीस प्रोजेक्ट हा सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Q

सॅटीस प्रकल्पामुळे काय फायदा होणार आहे?

A

सॅटीस प्रकल्पामुळे ठाण्याच्या स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. याचसोबत बससाठी एलिव्हेटेड डेकदेखील बांधण्यात येणार आहे. यामुळे ठाणे पूर्व आणि पश्चिम जोडले जाणार आहे.

Q

एलिव्हेटेड बस डेक कधीपर्यंत सुरु होणार?

A

ठाणे स्थानकाबाहेरील एलिव्हेटेड बस डेक डिसेंबर अखेरपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी काम प्रगतीपथावर सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com