Smart City : समृद्धी महामार्गानंतर मिशन 'स्मार्ट सिटी प्रोजेक्ट'! मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक, काय फायदा होणार?

Samruddhi Mahamarg Smart City: समृद्धी महामार्ग प्रकल्पानंतर आता स्मार्ट सिटी प्रोजेक्टवर शासनाद्वारे भर दिली जाणार आहे. यासाठीची बैठक ३० डिसेंबर रोजी भरवण्यात येणार आहे.
Smart city
Smart cityCanva
Published On

Smart City Project: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला असून त्याचे काम येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. पुढील कालावधीत महामार्गाचा शेवटचा टप्पा देखील कार्यान्वित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर आता सरकार महामार्गावरील स्मार्टसिटीच्या प्रकल्पावर भर देत आहेत. या प्रकल्पाशी संबंधित उच्चस्तरीय बैठक ३० डिसेंबर रोजी बोलवण्यात आली आहे.

समृद्धी महामार्ग आता बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे. महामार्ग प्रकल्पाचा शेवटचा टप्पा लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. महायुती सरकारद्वारे सत्तास्थापनेच्या पहिल्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाच्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत १६ ठिकाणी स्मार्ट सिटीची निर्मिती केली जाणार आहे.

महायुती सरकारने सत्तास्थापनेनंतरच्या पहिल्या शंभर दिवसात प्राधान्य द्यावयाच्या कामांची यादी तयार केली. या यादीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पासंबंधित उच्चस्तरीय बैठक येत्या ३० डिसेंबर रोजी मुंबईमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे. बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर पुढील कामांना सुरुवात होईल.

Smart city
Mumbai Pune Hyperloop: भारताचा पहिला 'हायपरलूप प्रोजेक्ट'! मुंबई-पुणे प्रवास फक्त अर्ध्या तासात

स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये खाली नमूद केलेल्या ठिकाणी स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे.

१. वर्ध्यातील विरुल

२. अमरावतीतील दत्तपूर, शिवनी

३. वाशिममधील शेह, वानोज, रिधोरा

४. बुलढाण्यातील साब्रा, माळ सावरगाव

५. जालन्यातील जामवाडी

६. छत्रपती संभाजीनगरमधील हडस पिंपळगाव, जांबरगाव

७. जिह्यातील धोत्रा कोपरगाव, सावळा विहीर

८. ठाणे जिह्यातील फुगाले, सपगाव, लेणाड

यातील विरुन आणि माळ सावरगाव या दोन ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाला वेग आला आहे.

स्मार्ट सिटीमुळे होणारे फायदे:

१. जेएनपीटी, वाढवन यांसारख्या बंदरांनी महामार्ग जोडल्याने निर्यातीचे प्रमाण वाढेल.

२. कृषीक्षेत्राशी निगडीत उद्योग व्यवसाय निर्माण होतील. शेतकऱ्यांना फायदा होईल.

३. आसपासच्या लघुउद्योगांना चालना मिळेल.

४. स्मार्ट सिटीच्या परिसरात युवकांना रोजगाराची मोठी संधी प्राप्त होईल.

५. आयात-निर्यातीचे प्रमाण वाढल्याने स्थानिकांना फायदा होईल.

Smart city
Crime News : विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार, बिर्यानी विकणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com