
Mumbai Pune Hyperloop: मुंबई-पुणे प्रवास आता अधिक जलद, सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. या दोन्ही महानगरांदरम्यान हायपरलूक वाहतूक व्यवस्था सुरु होणार आहे. मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्णपणे तयार होऊन प्रवासासाठी खुला होणार आहे, असे म्हटले जात आहे. प्रवासाचा हा नवा मार्ग देशासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. हा भारतातील पहिला हायपरपूल प्रकल्प असल्याचेही म्हटले जात आहे.
हायपरलूप ही वाहतुकीची अत्याधुनिक व्यवस्था आहे. वाहतुकीच्या या नव्या पर्यायामुळे वेळेची बचत होते. हायपरलूपमध्ये व्हॅक्युम ट्यूबमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेव्हीटेटिंग पॉड असतात. विद्युत चुंबकीय शक्तीच्या मदतीने हे पॉड्स पुढे जातात. हायपरपूलमुळे मुंबई-पुणे प्रवास फक्त २५ मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. वाहतुकीच्या अन्य माध्यमांच्या तुलनेमध्ये हा प्रकार अधिक सुरक्षित असणार आहे. वाहतुकीचा हा नवा प्रकार इकोफ्रेंडली देखील आहे.
शासनाच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानावर पुण्यातील क्विंट्रान्स हायपरलूप प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. कॉक्रीट ट्यूब, मोटर कर्मशलायजेशन, मॅग्नेटीक लेविएशन मॉड्यूल अशा नव्या तांत्रिक कल्पनावर केले जात आहे. वाहतुकीसाठी लहान हायपरलूप कार्गो ट्रॅक २०२९ मध्ये सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्गो ट्रॅक व्यवस्थितपणे कार्यरत झाल्यानंतर प्रवाशांना हायपरलूपचा प्रवासाकरीता वापर करता येणार आहे.
हायपरलूप प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवास अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात पूर्ण होणार आहे. या प्रवासासाठी १,००० ते १,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. मुंबई-पुणे प्रवास हवाई मार्गाने करायचा असल्यास साधारणपणे ३,००० रुपये खर्च येतो. तर वंदे भारत एक्सप्रेसने हा प्रवास करताना ७५० रुपयांचे तिकीट काढावे लागते. याचा अर्थ विमान, रेल्वेपेक्षा कमी खर्चात आणि तुलनेने कमी वेळेत मुंबई-पुणे प्रवास करता येणार आहे.
मुंबई-पुणे हायपरलूप मार्गाचे फायदे:
१. प्रवाशांचा वेळ वाचेल. गाडीने किंवा रेल्वेने हा प्रवास ३-४ तासांचा आहे. तेच आता अर्धा तासात प्रवास पूर्ण होईल.
२. हायपरलूप वाहतूक व्यवस्था पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे.
३. मुंबई-पुणे या दोन महानगरांमधील औद्योगिक व्यवस्था, वाहतूक आणि पर्यटनाला चालना मिळेल.
४. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महामार्गावर होणार वाहतुकीचा प्रश्न सुटेल.
प्रकल्पासमोरील आव्हाने:
१. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेव्हिएशन आणि ट्यून सिस्टीममध्ये नव्या अपडेटची गरज आहे.
२. प्रकल्पासाठी कायदेशीर तरतूदी पूर्ण करत त्यासाठी परवानगी मिळवणे.
३. प्रकल्पाचे योग्य नियोजन करुन निधीचा योग्यपणे वापर करणे.
४. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हायपरलूप नेटवर्क तयार करणे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.