Crime News : विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार, बिर्यानी विकणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Anna University Student Raped Inside Campus: विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर चेन्नईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On
Summary

Anna University Student Raped Inside Campus: विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर चेन्नईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Anna University Rape Case : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधील अण्णा विद्यापीठात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिलेय. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी विद्यापीठाच्या बाहेर बिर्यानी विकणाऱ्या हातगाडीवाल्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईमधील अण्णा विद्यापीठाच्या कॅम्पस (Anna University Campus) मध्ये बुधवारी सकाळी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. त्याआधी दोन जणांनी तिच्या मित्रांना बेदम मारहाण केली होती. ती विद्यार्थीनी मित्रासोबत कॅम्पसमधील एका ठिकाणी गप्पा मारत बसलेली होती. त्यावेळी दोन जणांनी विद्यार्थीनिच्या मित्रांवर हल्ला केला. त्यानंतर तिला झुडपात ओढळं अन् लैगिंक अत्याचार केले. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी ३७ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तो विद्यापीठाच्या बाहेर हातगाड्यावर बिर्यानी विकतो, असं तपासात समोर आलेय.

Crime News
Pune Crime : पुणे हादरले! घराबाहेर खेळता खेळता चिमुकल्या बहिणी गायब, शहराबाहेर ड्रममध्ये मृतदेह आढळले

अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवरील बलात्काराच्या या घटनेनंतर संपूर्ण चेन्नई हादरली आहे. याबाबत विद्यार्थिनीनेच पोलिसांत तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण हलके घेत कोणतीही कारवाई केली नाही. सोशल मीडियावर हे प्रकरणाची चर्चा सुरू झाली, विद्यापीठात आंदोलन करण्यात येऊ लागले. विद्यार्थ्यांचा आणि लोकांचा रोष पाहता पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अन् कारवाई केली.

Crime News
Pune Crime : पुण्यात रक्षकच झाला भक्षक! ड्युटीवर असणाऱ्या पोलिसानं ५ वर्षांच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

विद्यार्थिनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत घटनाक्रम सांगितला. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ती कॉलेज कॅम्पसमध्ये मित्रांसोबत गप्पा मारत बसली होती. त्यावेळी आरोपी तिथे आला अन् त्यानं लैंगिक अत्याचार केला. पीडितेने कोट्टूरपुरम महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोकांचा रोष पाहता तपासासाठी पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विद्यापीठाबाहेर बिर्यानी विकणाऱ्याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Crime News
Kalyan Crime: अपहरण करून घरात नेलं, अत्याचारानंतर निर्घृण हत्या, कल्याणच्या घटनेचा असा झाला उलगडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com