सर जे जे मार्ग पोलीस ठाण्याच्या दोघा पोलीस हवालदारांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ५००० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलं आहे. पासपोर्ट पडताळणीसाठी मागितली होती ६००० हजार रुपयांची लाच मागीतल्याची माहिती आहे. निलेश शिंदे आणि साहेबराव जाधव अशी हवालदारांची नावं असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
गुजरातच्या सूरतमध्ये दिवसाढवळ्या ४०० रुपयांसाठी हत्या करण्यात आली आहे. या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नानपुरा मक्काई पूल वर्तुळाजवळ ११ मार्चला पोलिसांना एक मृतदेह आढळला. या नंतर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं कारण शवविच्छेदन अहवालात उघडकीस आलं आहे.
धावत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाचा फटका मारुन मोबाईल पळवणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र दुर्दैवी बाब म्हणजे ज्या प्रवाशाचा मोबाईल चोरण्यात आला त्याचा चोरट्याने फटका मारल्याने तोल जाऊन रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रभास भणगे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.