Gadchiroli News: गडचिरोलीत पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक; मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त

Gadchiroli an anti-naxal operation: गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxalites) बुधवारी रात्री चकमक उडाली. या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
Gadchiroli an anti-naxal operation:
Gadchiroli an anti-naxal operation: Saamtv

Gadchiroli Breaking News:

एकीकडे लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच गडचिरोलीमध्ये नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गडचिरोलीमध्ये पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवरील भुमकन गावाजवळ गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxalites) बुधवारी रात्री चकमक उडाली. या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घातपात घडवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी डाव रचला होता.

गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांचे सी-60 व शीघ्र कृती दलाचे जवान परिसरात अभियान राबवत असताना अंधारात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात जवानांनीही प्रतिउत्तर दिले. ही चकमक रात्री जवळपास तीन वेळा उडाली. मात्र पोलीस जवानांचा दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gadchiroli an anti-naxal operation:
Sunil Shelke News: मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार; सुनील शेळकेंकडून 'यू टर्न' घेण्याची तयारी

दरम्यान, आज (ता. २८ मार्च) सकाळी घटनास्थळावर सर्चिंग केली असता झडतीमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी सामान, साहित्य, वायर्स, जिलेटिनच्या काठ्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या भागात नक्षलविरोधी अभियान सुरूच आहे. (Crime News In Marathi)

Gadchiroli an anti-naxal operation:
Latur Politics : डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर? लातूरमध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com