
ठाणे : ठाण्यातील अंबरनाथ पश्चिम येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील नवीन भेंडीपाडा येथे भरपावसात लघुशंका करायला गेलेल्या तरूणासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. काल मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास लघुशंका करायला गेलेल्या तरुणाला नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागून तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ठाणे जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. दरम्यान, काल मंगळवारी अंबरनाथमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात अंबरनाथ पश्चिम येथील नवीन भेंडीपाडा परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक १६ वर्षीय तरुण विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडला. विघ्नेश कचरे असं या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विघ्नेश लघुशंकेसाठी नाल्याजवळ गेला. लघुशंका करत असतानाच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे अंबरनाथ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विघ्नेश ज्या ठिकाणी लघुशंकेसाठी गेला त्या ठिकाणी विजेचा प्रवाह खुला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. पुढे उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तरुणाचा मृतदेह पाठवण्यात आला.
वीज जोडणी करताना दुर्दैवी घटना
विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्ती साठी वीज जोडणीचे काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाला. यावेळी विद्युत खांबावर काम करण्यासाठी चढलेल्या एका खासगी वायरमनला विजेचा जोरदार झटका बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी सोलापुरातील मंगळवेढ्यात घडली. या प्रकरणी नातेवाईकांनी महावितरणच्या चुकीमुळे घटना घडल्याचा आरोप केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.