
कबुतराला वाचवताना अग्निशामक जवानाचा मृत्यू.
हाय व्होल्टेज विजेचा धक्का बसून गमावले प्राण.
ठाणे महापालिकेच्या दिवा परिसरात घडली दु:खद घटना
विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Thane Diva News : ठाण्यातून एक दु:खद घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात एका अग्निशामक जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा जवान कबुतराला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा हाय व्होल्टेज विजेचा जबर धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा पसिरात ही घटना घडली आहे. फक्त एका कबुतराला वाचवण्यासाठी गेलेल्या ठाणे अग्निशामक दलातील जवान उत्सव पाटील (वय २५ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. विजेच्या तारेवर अडकलेल्या कबुतराची सुटका करताना उत्सव यांना विजेचा धक्का बसला होता.
विजेच्या तारेवर अडकून बसलेल्या कबुतराचा जीव वाचवत असताना उत्सव पाटील यांना हाय व्होल्टेज विजेचा जोरात धक्का बसला. यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिवा परिसरात घडलेली ही घटना संपूर्ण ठाणेकरांना हादरवून गेली आहे.
कळव्यामध्ये मराठी माणसाला मारहाण
कळवा रेल्वे स्थानक परिसरात एका मराठी व्यक्तीला परप्रांतीय महिलेने मारहाण केली. अर्जुन काटे असे त्यांचे नाव आहे. रेल्वेमधून उतरत स्टेशन परिसरात चालताना ही महिला मागून धक्का मारत होती. धक्का लागल्याने बघून चाला असे मराठीत म्हटल्यानंतर त्या महिलेने अर्जुन यांना मारहाण केली. त्याशिवाय शिवीगाळ करत मराठीवरुन अपशब्द वापरले. अर्जुन काटे यांच्या पत्नी स्वरा काटे या मनसे पदाधिकारी आहेत. त्यांनी या परप्रांतीय महिलेचा माज उतरवला. या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.