Helicopter Crash : टेकऑफनंतर लगेच खाली कोसळले हेलिकॉप्टर, ५ जण जखमी; पाहा थरारक Video

Helicopter Crash Video : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळले, या अपघातात ५ जण गंभीररित्या जखमी झाले. हेलिकॉप्टरचे पंख झाडाला आदळल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
Helicopter Crash Video
Helicopter Crash Videox
Published On
Summary
  • सोशल मीडियावर हेलिकॉप्टर क्रॅशचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये घडली.

  • हेलिकॉप्टरमधील दोघे आणि रस्त्यावरील तिघेजण यात जखमी झाले.

Helicopter Crash Viral Video : सोशल मीडियावर एक हेलिकॉप्टर कॅशचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे हेलिकॉप्टर टेकऑफनंतर काही वेळातच खाली कोसळले. या अपघातामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील हंटिंग्टन स्ट्रीटच्या चौकात घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील हंटिंग्टन स्ट्रीट आणि पॅसिफिक कोस्ट हायवेजवळ काल शनिवारी (११ ऑक्टोबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरचा अपघात झाला. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन जण होते. हे दोन जण आणि रस्त्यावरचे तिघेजण दुर्घटनेमध्ये जखमी झाले. सर्वांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Helicopter Crash Video
बॉस असावा तर असा! दिवाळीची तब्बल ९ दिवसाची सुट्टी, घरी राहा आणि मज्जा करा; थेट CEO चा ईमेल

कॅलिफोर्नियातील हेलिकॉप्टर क्रॅशचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हेलिकॉप्टर कमी उंचीवर उडत असताना त्याचे पंख एका ताडाच्या झाडावर आदळतात. तेव्हा हेलिकॉप्टरचे नियंत्रण सुटते. सुरुवातीला हेलिकॉप्टर फिरत राहते आणि नंतर खाली कोसळले, असे व्हिडीओमध्ये दिसते.

Helicopter Crash Video
Rainfall Alert : सतर्क राहा! पुढचे ७ दिवस धो-धो कोसळणार, IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर एअरलाईन क्षेत्रातील दिग्गज एरिक निक्सन चालवत होते असे म्हटले जात आहे. १९८० बेल २२२ (टेल नंबर N222EX) हेलिकॉप्टर असे अपघातग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हेलिकॉप्टरमधील दोघांना बाहेर काढले आणि सर्व जखमींना रुग्णालयात नेले.

Helicopter Crash Video
School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com