>> गिरीश कांबळे
आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याचीच रणनीती ठरवण्यासाठी मातोश्रीवर आज आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या आढावा घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यामध्ये ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार गजनान किर्तीकर हे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागी त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना मैदानात उतरवण्याची तयारी ठाकरे गटाने सुरु केली आहे. ठाकरे गटाने गणेशोत्सवापूर्वी मुंबई वगळता राज्यातील इतर लोकसभा मतदारसंघाचा घेतला होता आढावा. आता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)
सूत्रांनी सांगितलं की, या बैठकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावाही घेण्यात आला. 2019 मध्ये ही जागा आपण जिंकून आलोय. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीला देखील ही जागा आपल्याकडेच राहील आणि उमेदवार देखील अरविंद सावंत असतील, त्यामुळे कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत, असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची तयारी सुरू झाली आहे. आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे याणी कार्यकर्त्यांना दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.