Dhule News: शिरपूर शहरात तलवार गँगची दहशत; पोलिसांनी शहरातून काढली धिंड

Dhule News: शिरपूर शहरात दहशत माजवणाऱ्या तलवार गँगची पोलिसांनी काढली धिंड काढली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील भाजी बाजारात दहशत मातवण्यासाठी तलवारीने गँगमधील पाच जणांनी एकावर हल्ला केला होता.
Dhule News
Dhule NewsSaam Digital
Published On

Dhule News

शिरपूर शहरात दहशत माजवणाऱ्या तलवार गँगची पोलिसांनी काढली धिंड काढली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील भाजी बाजारात दहशत मातवण्यासाठी तलवारीने गँगमधील पाच जणांनी एकावर हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर देखील या गँगमधील काही जणांनी केला होता हल्ला. दरम्यान आज शिरपूर शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने या गँगमधील पाच जणांच्या मुसक्या आवळत त्यांची शहरातून धिंड काढली.

हिंजवडी पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

परदेशात नोकरी आणि राहण्याची व्यवस्था करून देतो असं बेरोजगार तरुणांना स्वप्न दाखवून लुटणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय प्रताप सिंग, किसन देव पांडे, हेमंत सिताराम पाटील आणि किरण अर्जुन राऊत अशी बेड्या ठोकलेल्या टोळीतील आरोपीचे नाव आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विजय सिंग, किसन पांडे आणि हेमंत पाटील या तिन्ही आरोपींनी मिळून कस्तुरी चौकाजवळील आयकॉन टावर या ठिकाणी ब्ल्यू ओसियन मरीन कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून या आरोपींनी ब्रुनेई देशाचा बनावट शिक्के तयार करुन, त्या देशाचे बनावट वर्कऑर्डर देखील तयार केले होते.

Dhule News
Kalyan Police: तक्रात दाखल करण्यासाठी जात असतानाच गाठलं अन् चाकूने केले वार, उल्हासनगर हत्या प्रकरणात ६ जणांना अटक

आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर आणि प्लंबरचे जॉब लावून देतो म्हणून उमेदवारांकडे लाखो रुपये वसूल केले होते असे पोलीस तपासात उघडकीस आला आहे. या टोळीतील आरोपींनी पूर्णानगर येथील युनिक प्रिंटर्स अँड झेरॉक्स दुकानाचे मालक किरण अर्जुन माने यांच्याकडून नेग्रा ब्रुनेई दारुसंलाम देशाचे बनावट शिक्के तयार करून घेतले होते असे देखील पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Dhule News
PM Modi On Pakistan: SPG ने नकार दिल्यानंतरही PM मोदी का गेले पाकिस्तानात? खासदारांसोबत स्नेह भोजनावेळी सांगितलं गुपीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com