अफगाणिस्तानच्या दौऱ्यावरून परत येताना नवाझ शरीफ याच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान मोदी पाकिस्तानात गेले होते. त्यावरून भारतात राजकीय वादंग उठलं होतं. आता खुद्द पंतप्रधानांनी या अनिश्चित दौऱ्यावरचं गुपीत उघड केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांसोबत स्नेह भोजन केलं. यादरम्यान भाजप खासदार हीना गावित, एस. फांगनॉन कोन्याक, टीडीपी खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार रितेश पांडे आणि बीजेडी खासदार सस्मित पात्रा आणि एनके प्रेमचंद्रन यांनी पंतप्रधान मोदींसोबत जेवण केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2.30 वाजता फोन आल्यानंतर खासदारांना अनौपचारिक भोजनाची माहिती मिळाली. 'चला, तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल', असं मिश्किलपणे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि खासदारांनी कॅन्टीनमध्ये शाकाहारी जेवण आणि नाचणीच्या लाडवाचा आस्वाद घेतला.
दुपारच्या जेवणादरम्यान एका खासदाराने पंतप्रधान मोदींना नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नात त्यांच्या अनियोजित भेटीबद्दल विचारले असता, पंतप्रधान म्हणाले, ते दुपारी २ वाजेपर्यंत संसदेत होते. त्यानंतर ते अफगाणिस्तानला रवाना झाले. परत आल्यावर त्यांनी पाकिस्तानात राहण्याचा निर्णय घेतला. एसपीजीनेही तसे करण्यास नकार दिला होता. पीएम मोदींनी सांगितले की, एसपीजीच्या नकारानंतरही त्यांनी नवाझ शरीफ यांना फोन केला आणि विचारले की ते त्यांना स्वीकारतील का. त्यानंतर ते पाकिस्तानला गेले.
मोदींनी त्यांचा प्रवास, अनुभव आणि योगाबद्दल अनौपचारिक संवाद साधला. खिचडी हे त्यांचं आवडतं खाद्य आहे. पंतप्रधानांनी एका खासदाराला सांगितले की, कधी कधी माझा प्रवास इतका असतो की मी एक एक दिवस झोपलेलोच नाही.
रितेश पांडेने पंतप्रधान मोदींना भूज भूकंपाच्या दुर्घटनेला सामोरे जाण्याचा अनुभव विचारला. एका खासदाराने सांगितले की, मला पीएमओकडून फोन आला की कृपया या... पंतप्रधानांना तुम्हाला भेटायचे आहे. आम्ही कॅन्टीनमध्ये पोहोचलो तेव्हा आम्ही व्हिजिटर्स लाउंजमध्ये होतो. आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि आम्हाला कसं काय बोलावलं गेलं याचं आश्चर्य वाटलं. खासदार म्हणाले की हा एक उत्तम अनौपचारिक अनुभव होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.