Bharat Ratna: कोणाला मिळालं कमी वयात भारतरत्न? कधीपासून दिला जातोय पुरस्कार? जाणून घ्या भारतरत्न पुरस्कारामागील खास गोष्टी

Bharat Ratna Award: केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी. व्ही. नरसिंहा राव यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.
 bharat ratna Award Process
bharat ratna Award Process Saam Digital
Published On

Bharat Ratna

केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी. व्ही. नरसिंहा राव यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता.

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जिवंतपणी किंवा मरानोत्तर हा पुरस्कार दिला जातो. चौधरी चरण सिंह आणि पी. व्ही. नरसिंहा राव यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर या पुरस्काराविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालंच असेल, आज आपण याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 bharat ratna Award Process
Pakistan Election 2024: पाकिस्तानच्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या बाजून जनतेचा कौल, पण खेळ बिघडवण्यासाठी लष्कराचा प्लान तयार

कधीपासून दिला जातोय भारतरत्न पुरस्कार

तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २ जानेवारी १९५४ रोजी भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात केली

भारतरत्न पुरस्कारासोबत मेडल आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं. कोणत्याही प्रकारची रक्कम किंवा पैसे दिले जात नाहीत.

भारताचा स्टार क्रिकेटर सचिन तेंडुलकरला सर्वात कमी वयात भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

२०११ मध्ये क्रीडा प्रकारांना यात समावेश करण्यात आला.

१३ जुलै १९७७ ते २६ जानेवारी १९८० या काळात भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही

१९९२ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी मरनोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. मात्र एका जनहित याचिकेवरून मरनोत्तर हा शब्द मागे घेण्यात आला

स्वतंत्र भारतानंतर पहिल्यांदाच विदेशी व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खान अब्दुल गफार खान यांना १९८७ मध्ये या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

 bharat ratna Award Process
Lok Sabha 2024 Survey: महाराष्ट्रात मोदींच्या विजयी रथाला लगाम? फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला बसणार फटका?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com