Teacher And Graduate Constituency: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधुम सुरू; कोणत्या पक्षाकडून कोण लढणार?

Teacher And Graduate Constituency Election Candidate: राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची धामधुम सुरू झाली आहे. आता आपण कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवत आहे, हे सविस्तर जाणून घेऊ या.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका
Teacher And Graduate ConstituencySaam Tv

राज्यात लोकसभेनंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेवक अमीत सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमीत सरैय्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अमीत सरैय्या यांनी (Sharad Pawar) गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारासंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैय्या यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता शिवसेना ठाकरे गटसुद्धा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Teacher And Graduate Constituency) उतरला आहे. कोकण पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीत काँग्रेससोबत शिवसेना ठाकरे गट उमेदवारी अर्ज भरत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार किशोर जैन हे कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज भरत आहेत. याआधी काँग्रेसकडून रमेश कीर यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

एकीकडे इतर जागा महाविकास आघाडी एकत्र लढत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात मविआकडून (Uddhav Thackeray) आघाडी धर्म पाळला जात नसल्याचा दिसतंय. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे रिंगणात आहेत. तर मनसेने उमेदवार जाहीर केल्यानंतर माघार घेतल्याचं दिसलं आहे. अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मनसेने जाहीर केली होती, परंतु त्यांनी आज निवडणूक लढवत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका
Baramati Lok sabha : बारामतीत सुप्रिया सुळे दीड लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या, अजित पवार गटाचं गणित कुठं फसलं?

मुंबई शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव नलावडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. भाजपकडून (BJP) निरंजन डावखरे कोकण पदवीधर, किरण रवींद्र शेलार हे मुंबई पदवीधर आणि शिवनाथ दराडे हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका
Lok Sabha 2024: दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात; लोकसभा निवडणुकीत दोन उमेदवारांनी मिळवला दणक्यात विजय; आता पुढे काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com