Uddhav Thackeray On BJP: 'शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारे औरंगजेबच, त्यांच्या छाताडावर भगवा रोवायचा आहे', उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका...

Uddhav Thackeray Latest News: 'शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारे औरंगजेबच, त्यांच्या छाताडावर भगवा रोवायचा आहे', उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका...
Uddhav Thackeray On BJP
Uddhav Thackeray On BJPSAAM TV
Published On: 

Uddhav Thackeray On BJP: ''शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे की नाही. औरंगजेबाची वृत्ती फडणवीस यांच्या पक्षातच आहे. महाराष्ट्रात नाही आहे'', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्या राज्य आणि जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray On BJP
Uddhav Thackeray Latest Speech: 'भाजप संपूर्ण उभा राहिला तरी मला संपवू शकत नाही'; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''महाराष्ट्रात सध्या औरंगजेब-औरंगजेब सुरु आहे. औरंगजेबचे समर्थक आम्ही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा औरंगजेब समर्थक कुठे होते? आमच्यावेळी का दंगल घडली नाही? तुम्ही (भाजप) आल्यावर दंगली कशा घडत आहेत.''  (Latest Marathi News)

ठाकरे म्हणाले, ''माझं असं मत आहे की, आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे. कसा? जे इतिहासात आजपर्यंत वाचलं, जे आजपर्यंत कानावर पडलं, त्यात औरंगजेबाने जे मराठ्यांबद्दल बोलला आहे की, हे मराठे पहाडी मुलखात तमाम दुनियेला भारी आहेत. इथे पराक्रम शिकवावा लागत नाही, इथं स्वतः गवताला भाल्याची पाते फुटतात.''

Uddhav Thackeray On BJP
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : देवेंद्रजींची दया येते, किती ओझी वाहणार; उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका

भाजपला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही (संभाजी ब्रिगेड) आज संभाजी महाराजांचं नाव घेऊन पुढे जात आहेत. आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पुढे जात आहोत. मात्र दोघांच्या हातात भगवा आहे. या भागवल्या संपवणारा जो राजकीय औरंगजेब बसला आहे, जो तिथे राजकीय अफझल खान बसला आहे. त्यांच्या समोर त्यांच्या छातीवर भगवा रोवायचा आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.