Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : देवेंद्रजींची दया येते, किती ओझी वाहणार; उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका

Political news : भाजप आता आयारामांचा पक्ष झाला आहे. आमच्या हृदयातील राम तुम्ही काढू शकत नाहीत.
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Saam TV
Published On: 

सचिन गाड

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांची अवस्था आता सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्या राज्य आणि जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः मार्गदर्शन केले.

मला खरंच दया येते देवेंद्रजींची

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, 'सामना' सिनेमातील 'कोणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' हे गाणं मला आठवतंय. मला खरंच दया येते देवेंद्रजींची, किती ओझी वाहणार. पण पंचाईत अशी झाली आहे की, पूर्वी जाहिरात यायची छोटी, 'सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.' (Latest Marathi News)

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Latest Speech: 'भाजप संपूर्ण उभा राहिला तरी मला संपवू शकत नाही'; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

देवेंद्रजींकडे मस्टर मंत्री राहणार?

आधी एक चढला, नंतर दुसरा चढला. आता गोविंदाचा थर लागतो की काय अशी परिस्थिती झाली आहे. किती उपमु्ख्यमंत्री. एक पक्ष चोरला, दुसरा पक्ष चोरला आता ऐकलं की काँग्रेसही फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढे उपमुख्यमंत्री केल्यावर देवेंद्रजींकडे राहणार काय? मस्टर मंत्री? नुसतं लिहून ठेवायचं कोण आला, अशी टीका  उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केली.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Jitendra Awhad News:...तर आम्हाला पुढची पिढी कधीच माफ करणार नाही; जयंत पाटील यांच्याबद्दलच्या चर्चांवर आव्हाडांची प्रतिक्रिया

भाजप आता आयारामांचा पक्ष

आता भाजपमध्ये राम राहिलेला नाही. भाजप आता आयारामांचा पक्ष झाला आहे. आमच्या हृदयातील राम तुम्ही काढू शकत नाहीत. राम मंदिर बांधा, पण तुम्ही आज आयाराम मंदिर बांधलं त्याचं काय? भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना आयारामांचा पूजा करावी लागत आहे. यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.