Maharashtra Election : प्रदीप शर्मांच्या पत्नीने फडकावला बंडाचा झेंडा; सेनेत प्रवेश करुनही संधी हुकली, आता कसं असणार समीकरण?

Maharashtra Election : प्रदीप शर्मांच्या पत्नीने फडकावला बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यांचा सेनेत प्रवेशकरूनही संधी हुकली आहे.
pradip Sharma
Maharashtra ElectionSaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : महायुतीच्या जागावाटपात अंधेरी पूर्व विधानसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळताच भाजपकडून इच्छुक असलेले मुरजी पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. त्यानंत आज उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्ती प्रदर्शन केलं. मात्र उमेदवारीसाठी शिंदे गटात प्रवेश केलेल्या स्वीकृती शर्मा यांची उमेदवारीची आशा मावळताच त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनीही मोठे शक्ती प्रदर्शन केलं. यामुळे आता शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्वची ही निवडणूक काहीशी अवघड जाणार अशीच चिन्ह सध्या निर्माण झाले आहे. अंधेरी पूर्व विधानसभेत आता तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार हे मात्र येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मागील अनेक वर्षांपासून अंधेरी पूर्व परिसरात पीएस फाउंडेशनच्या माध्यमातून जनतेच्या हिताची कामे करत आहेत. गरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी अंधेरी पूर्व विधानसभेत चार रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गल्लोगल्ली जाऊन रुग्णांना आरोग्य सेवा पुरविल्या.

काही दिवसांपूर्वीच प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गट पक्षात प्रवेश केला. तेव्हापासूनच त्यांच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या उमेदवारीची चर्चा देखील रंगू लागली.

आज ऐनवेळी स्वीकृती शर्मा यांचं नाव मागं पडलं. त्यानंतर भाजपच्या मुरजी पटेल यांचं नाव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून निश्चित होताच प्रदीप शर्मा यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत त्यांची पत्नी स्वीकृती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अंधेरी पूर्वच्या विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. आज अखेरीस आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हजारो समर्थकांसह निवडणूक कार्यालयात पोहोचून स्वीकृती शर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पोटनिवडणुकीत लटके विजयी, पटेल यांची माघार

2023 मध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी लढण्याची तयारी केली. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुराजी पटेल यांच्यावर दबाव टाकून त्यांना या निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले.

पटेल यांनी त्यांच्या समर्थकांना नोटाला मतदान करण्याचे आव्हान केल्याची चर्चा देखील मतदारसंघात रंगली होती. ऋतुजा लटके यांना सर्वाधिक ६६ हजार ५३० मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकाची मते अपेक्षेप्रमाणे नोटा या पर्यायाला मिळाली. या मतदारसंघात १२ हजार ८०६ मतदारांनी नोटाचे बटण दाबल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

आता या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर काल 28 ऑक्टोबर रोजी मुरजी पटेल यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांच्या पत्नीने अपक्ष अर्ज भरला. त्यांनी आज 29 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर आहे. अखेरच्या मुदतीपर्यंत जर स्वीकृती शर्मा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. तर मात्र अंधेरी पूर्वची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे मात्र नक्की. अंधेरीकर त्यांचा कौल कुणाच्या बाजूने देतील हे मात्र सध्या सांगणे कठीण आहे. मात्र स्वीकृती शर्मा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराची अडचण वाढणार आहे.

मूरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप नाराज

उमेदवारीसाठी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. यातील अनेक नाराज पदाधिकारी शर्मा यांच्या निर्णय बैठकीत देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले होते. अंधेरीतील भाजप संपवण्याचा हा प्रकार असल्याचा दावा देखील भाजप समर्थकांकडून करण्यात आला होता. आता भाजप शिवसेना शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांचे काम करणार का हे देखील निवडणूक प्रचारादरम्यान पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com