Maharashtra Election : विधानसभेत भाजपमधील बड्या नेत्यांची बंडखोरी, 'या' मतदारसंघात महायुतीसमोरच असणार तगडं आव्हान

Maharashtra Election update : विधानसभेत भाजपमधील बड्या नेत्यांची बंडखोरी दिसून येत आहे. महाराष्ट्रातील काही मतदारसंघात महायुतीसमोरच असणार तगडं आव्हान असणार आहे.
devendra fadnavis
Devendra FadnavisSaam Tv
Published On

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजप राज्यात सर्वाधिक मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत अनेक भाजप नेत्यांनी बंडखोरी केल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळत आहे. भाजपच्या शायना एनसी यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असणार आहेत.

भाजपच्या मुंबादेवी व्यतिरिक्त अकोला पश्चिम, बोरिवली, मालाड पश्चिम सारख्या मतदारसंघातही भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून तिकीटाची अपेक्षा असणारे गोपाळ शेट्टी यांनीही अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. भाजपने बोरिवली मतदारसंघात भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी मिळाली आहे. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज भरणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आशिष शेलार यांनी सोमवारी रात्री त्यांची भेट घेतली. मात्र, ते निवडणूक लढण्यावर ठाम होते.

devendra fadnavis
Baramati Assembly Constituency: पवार विरुद्ध पवार लढाई, अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीमध्ये तगडी फाइट

भाजपच्या शायना एनसी या वरळीतून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र, त्यांना शिंदे गटाकडून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. उमेदवारी जाहीर होताच शायना एनसी यांनी शिंदे गटाची वाट धरली. शायना यांची काँग्रेसच्या आमीन पटेल यांच्याविरोढात लढत होणार आहे. शायना एनसी यांना उमेदवारी मिळताच अतुल शाह यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानंतर अतुल शाह यांनी भूमिका मागे घेतली.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातही अजित पवार गटाकडून झिशान सिद्धिकी यांना उमेदवारी मिळाली आहे. तर शिंदे गटाकडून कुणाल सरमळकर यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतही लढाई पाहायला मिळणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते हरिश आलिमचंदानी यांनी अपक्ष लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातही महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

devendra fadnavis
Assembly Election: कळमनुरीत रंगणार चौरंगी लढत? संतोष बांगरांना ठाकरेंच्या टारफेंचं आव्हान

लोकसभा उत्तर पश्चिम मतदारसंघातील बोरिवली विधानसभा मतदारसंघातून स्थानिक माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पक्षाविरोधात उमेदवारी अर्ज केल्यानंतर याच मतदारसंघातील भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा महामंत्री ब्रिजेश सिंह यांनी देखील पक्षाच्या विरोधात जाऊन मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मागील अनेक वर्षांपासून पक्षात काम करून देखील दुसऱ्याला संधी दिल्याने नाराज असलेले ब्रिजेश सिंह यांनी आज उमेदवारीचा अर्ज भरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com