Swayam Talks 2024: करिअरची वेगळी वाट निवडणाऱ्या दिग्गजांचा प्रेरणादायी प्रवास; मुंबईकरांनी चुकवू नये असा कार्यक्रम, कधी आणि कुठे असेल?

कृत्रिम बुद्धीमता (एआय), छायाचित्रण , भाषा ते अर्थ अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या दिग्गज व्यक्तींचे अनुभव ऐकण्याची संधी मुंबईतील नागरिकांना मिळणार आहे.
Swayam Talks 2024
Swayam Talks 2024Saam tv

Swayam talks 2024 in Mumbai :

कृत्रिम बुद्धीमता (एआय), छायाचित्रण , भाषा ते अर्थ अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या दिग्गज व्यक्तींचे अनुभव ऐकण्याची संधी मुंबईतील नागरिकांना मिळणार आहे. दिग्गजांचे अनुभव कथन ऐकण्याची संधी २८ जानेवारीला वांद्रे येथील बालगंधर्व मंदिरात मिळणार आहे. स्वयं आणि सकाळ माध्यम समूहाच्या संयुक्त विद्यमाने स्वयं टॉक्स २०२४ चे आयोजन करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

'स्वयं टॉक्स' म्हणजे सामान्यांमधील असामान्य व्यक्तींच्या प्रवासामधून नवे शिकण्याची, नव्या दिशा ओळखण्याची संधी देणारा मंच. पॅशन 360 प्रा. लि. आणि 'सकाळ' यांच्यावतीने आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्वयं टॉक्स २०२४ या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वक्त्यांशी स्वयं सुसंवादक डॉ उदय निरगुडकर हे संवाद साधतील.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Swayam Talks 2024
Career Tips: नोकरी बदलताना 'या' चुका मुळीच करू नका, नाहीतर येईल ताण

या स्वयं टॉक्स २०२४ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक तन्मय देवचके, फायनान्स क्षेत्रातील नोकरी सोडून आठ कलांमध्ये केवळ आठ महिन्यांत पारंगत झालेला स्वानंद केळकर, छायाचित्रकार आणि सोलो ट्रॅव्हलर आभा चौबळ, सुप्रसिद्ध छायाचित्रकार इंद्रजित खांबे, एआय तज्ज्ञ चिन्मय गवाणकर, पारशी भाषेचे अभ्यासक अश्विन चितळे, वास्तू विशारद अभय कानविंदे आणि एक विशेष वक्ता सहभागी होणार आहेत.

स्वयं टॉक्स २०२४ या कार्यक्रमाचे पी. एन. गाडगीळ अँड सन्स हे मुख्य प्रायोजक आहेत. तर अॅपल इंडिया हे सहप्रायोजक आहेत. त्याचबरोबर केसरी टुर्स, निमित्त, माधवबाग आणि एजिअस फेडरल इन्श्युरन्स लिमिटेड सहयोगी प्रायोजक असतील.

Swayam Talks 2024
Career Tips: नोकरी शोधताना 'या' चुका टाळा, अन्यथा...

कार्यक्रम कधी आणि कुठे

दिनांक – २८ जानेवारी

वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ६

ठिकाण - बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे (पश्चिम), मुंबई

तिकीट कुठे उपलब्ध आहेत?

या कार्यक्रमाचे काहीच तिकिटे शिल्लक आहेत. या कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी www.swayamtalks.org या संकेतस्थळाला भेट द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com